Advertisement

बोगस आदिवासी आमदार लता सोनवणे यांना मंत्रीपद देऊ नका: बिरसा फायटर्सची मागणी

*विधानसभा सदस्यत्व रद्द करा*

*कोर्टात व जात पडताळणी समितीत जात प्रमाणपत्र अवैध*
*आदिवासी नसल्याचे जात प्रमाणपत्र सिद्ध* 
*विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री यांना निवेदन* 

दापोली:चोपडा विधानसभेच्या वादग्रस्त आमदार लता सोनवणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा व नवीन मंत्रीमंडळात मंत्रीपद न देऊ नका,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
                     निवेदनात म्हटले आहे की,चोपडा विधानसभेचे आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याबाबतची तक्रार चोपड्याचे माजी आमदार जगदीश रमेश वळवी आणि अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली होती.नंदूरबार येथील जात पडताळणी समितीने चौकशी करून आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते.समितीच्या निर्णयाविरोधात लता सोनवणे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती.ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.
                आमदार लता सोनवणे ह्या अनुसूचित जमातीच्या उमेदवार म्हणून चोपडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आल्या होत्या.औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 3 डिसेंबर 2020 ला समितीचा आदेश रद्दबातल करून आमदार लता सोनवणे यांना अमळनेरचे उपविभागीय अधिकारीकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. दस्तावेज प्राप्त झाल्यानंतर कोर्टाने समितीकडे पाठवले.नवीन दस्तावेज दिसून आल्यामुळे समितीने ते दस्तावेज तपासणीसाठी पोलीस दक्षता पथकाकडे पाठवले होते.पोलीस दक्षता पथकाने तपास केला असता तिथे आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचेच असल्याचे सिद्ध करू शकल्या नाहीत. 
                आमदार लता सोनवणे यांनी आदिवासी असल्याचे भासवून जातीचे अवैध प्रमाणपत्राच्या आधारे विधानसभा सदस्यत्व मिळवले आहेत. तसेच आजवर खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून आमदारकीचे फायदे तसेच अनेक शासकीय योजनांचा,सोयी सुविधांचा लाभ घेतलेला आहे.अशा वादग्रस्त आमदाराला मंत्री पद दिल्यास पदाचा दुरूपयोग होऊन आदिवासींचे अधिकार, हक्क, आरक्षण धोक्यात येऊ शकते.तसेच आपल्या नवीन मंत्रीमंडळाला सुद्धा कलंक लागू शकतो. म्हणून अशा वादग्रस्त आमदार लता सोनवणे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावेत, नवीन मंत्रीमंडळात स्थान देऊ नयेत, हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स तर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments