Advertisement

आदिवासी राष्ट्रपतीसमोर बिरसा फायटर्सच्या 2 अटी,2 मागण्या

एसके जी पंधरे  महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त )

मुंंबई (२ जूूूैलै )
पहिल्यांदाच द्रौपदी मृर्मू नावाच्या रूपाने आदिवासी राष्ट्रपती होणार असल्याचा आनंद काही आदिवासी समूहांमध्ये आहे.तर काही जाणकार आदिवासींकडून आदिवासीं राष्ट्रपती झाल्यास आदिवासींच्या अस्तित्व व हक्काला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाश्र्वभूमीवर बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेतर्फे आदिवासी राष्ट्रपतींना 2 मागण्या ,2 अटी घालण्यात येणार आहेत. सन 2022 साली होणा-या जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र धर्मकोड/ सांस्कृतिक कोड मागणी मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतीने आपल्या अधिकारात सही करावी व समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी फेटाळावी,समान नागरी कायदा मंजूरीवर सही करु नये.अशा 2 मागण्या प्रामुख्याने बिरसा फायटर्स तर्फे करण्यात येणार आहेत. 
             आदिवासींची संस्कृती ही कुठल्याही धर्माशी मिळतीजुळती नाही.त्यामुळे आदिवासी हा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य धर्माचा नाही.आदिवासींची स्वतंत्र एक ओळख आहे.म्हणून आदिवासींना स्वतंत्र धर्मकोड किंवा सांस्कृतिक कोड लागू करावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने सातत्याने लावून धरली आहे.त्याचबरोबर देशात समान नागरी कायदा लागू झाल्यास आदिवासींचे व मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्यात येईल.अजूनही आदिवासीं बांधवांचा विकास झालेला नाही.शिक्षण,आरोग्य,घरे,रस्ते,जल,जंगल, जमीन इत्यादी मूलभूत सुविधा व हक्कांसाठी आदिवासी समाज लढत आहेत.अजूनही काही भागात आदिवासी मागासले लाच आहे,शिक्षण नाही,नोकरी नाही,सोयीसुविधांपासून वंचित आहे.त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास अशा आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे कठीण होईल, विकास होणार नाही.म्हणून आदिवासी राष्ट्रपती झाल्यास आदिवासींसाठी स्वतंत्र धर्मकोड किंवा सांस्कृतिक कोड लागू करावा व समान नागरी कायदा लागू करू नये,अशा आशयाचे पञासह 2 मागण्या व 2 अटी आम्ही आमच्या आदिवासी राष्ट्रपतीसमोर घालणार आहोत,ह्या मागण्या मान्य झाल्यास आम्हाला या देशाचा आदिवासी राष्ट्रपती झाल्याचा आनंद होईल व अभिमानही वाटेल,अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा ,तसेच सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष फायटर्स यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments