Advertisement

क्रांतीकाराचे अस्तित्व,शिक्षण घेत स्वाभिमान,व आरक्षणाचा निर्भय लढा जिंका तर सक्षम व विकसीत समाज तयार होईल:सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स



राणी दुर्गावती पुतळा अनावरण प्रसंगी गंगाझरी येथे महिला जन जागृती मेळाव्यात सुरेशकुमार पंधरेचे प्रतिपादन 

उपसंपादक टॄाईबल टाईगर 47 न्युज/एसके जी पंधरे महाराष्ट्र सहसंघटक (राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ (भारत सरकार मान्यता प्राप्त )


गोंदिया (२४ जून) गंगाझरी/ रेल्वे स्टेशनयेथे गोंडवानायुथ फेडरेशन बिरसा फायटर्स व राणी दुर्गावती मंचच्या संयुक्त विद्यमाने दुर्गावती मडावीपुतळा अनावरण सोहळ्या त्याप्रसंगी उदघाटक श्री राचेलवार प्रकल्प अधिकाऱी देवरी,व गोंडी सप्तरंगी ध्वजारोहन उपमुख्य का र्यकारी अधिकाऱी राजकुमारजी पुराम,जि प गोंदिया,अनावरण विशेष अतिथी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स हस्ते पार पडले प्रबोधनमंचकावर 
एस जी उईके महासचिव विदर्भ, डी बी खंडाते सर,अश्विनी पटले जि प सदस्या एकोडी,वंदना पटले पं स सदस्य,गंगाझरी,कुसूमताई पुसाम एच एम,तेजस्विनी कदम पोलीस निरिक्षक गंगाझरी,संचित वाढवे सर,ए.बी मरस्कोल्हे क्रिडा अधिकाऱी,सोनु घरडे,सरपंच,ग्राम पंचायत सदस्य हजर होते यावेळी "देश व समाजहितार्थ ज्यांचे वीर योद्यांनी प्रतिकुल परिस्थीतीतही जिवाची पर्वा न करता मोघल वा पाशवी शक्तीशी लढा दिला त्यात राणी दुर्गावतीचे नाव व बलिदान गोंडवाणा साम्रांज्याच्या जडण घडणीत समाज बांधवासाठी गोंड वाणात व भारत देशातील महिला पुरूषासाठी इतिहासातील महत्वा चे रक्तात माखलेलं व्यक्ती चरिञा चे पान व क्रांतिचे अध्याय आहे. बिरसाने जल जमीन जंगलचा नारा देत उलगुलान केला. तद्वत्च समाजाने धुरंधर वीरनारी आदर्श मातेच्या विचारसरणी,प्राण प्रतिष्ठे चा मार्ग आत्मसात करावा.समाज सुधारण्याचा विळा उचलुन तथाक थित व्यवस्थेला आव्हान द्यावा संविधान निर्माता डाँ. बाबासाहेबा नी दिलेला मंञ, जपत शिका संघटीत व्हा,व संघर्ष करा, उच्च शिक्षणा घेतले तरच कायदेशीर रित्या संविधानाला वाचवु शकाल. समाज आंतर शञुंच्या हातून वाचेल असे प्रति पादन आपल्या कणखर वाणीतून केले.कार्यक्रमा चेसंचालन बिरसाफायटर्स गोंदिया जिल्हासचिव लोकेशसिंग नागभिरे र्प्रास्ताविक संपतजी चौरागडे, आभार विवेक मरकाम कार्यक्रम यशस्वीतेसाठी टेकसिंग पुसाम हेमंतकुमार कुंभरे छञपाल नागभिरे ,रघुवर उईके, यांनी परिश्रम केले.

Post a Comment

0 Comments