Advertisement

बिरसा फायटर्सच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सुरेशकुमार पंधरे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड

 


बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी एका झुम मिटिंगच्या माध्यमातून सुरेशकुमार पंधरेची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड.



मुंबई :-(१७ जून) बिरसा फायटर्सच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने देशातील विविध अविकसीत क्षेञात आदिवासी, कल्याणार्थ सामाजिक राजकीय शैक्षणिक, धार्मिक कार्य सुरू आहे ते जनकार्य करण्यासाठी संघटनेचे झाळे पसरले आहे मजबूत करण्यासाठी व संविधानिक दर्जा उंचावणारे,विचारवंत, निसर्ग लेखक समाज सेवक आदिवासी उलगुलानाचे कणखर नेतॄत्ववान, कर्तव्यनिष्ठ कामदार,लेखनीचे शब्दरूपी धारदार पञकार व सरपंच परिषद मुबईचे राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच व समन्वयक मा श्री.सुरेशकुमार पंधरे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री.सुशिलकुमार पावरा यांनी एका झुम मिटिंगच्या माध्यमातून निवड करण्यात आली.
 त्यावेळी झुम मिटिंम सभेत राज्याध्यक्ष मनोज पावरा, राजेश धुर्वे,उपाध्यक्ष, दादा जी बागुल महानिरिक्षक,राजेंद्रजी पाडवी,महासचिव,गणेशजी खर्डे कार्याध्यक्ष ,सतिश जाधव भरत पावरा,जालिंदर पावरा, एकनाथ लाखोळे ,बळीरामजी कोठवार राहुल रावताळे,के आर पाडवी, विलास पावरा,नाशिक विभाग, राजाभाऊ सरनोबत कोकण विभाग,विजय शहारे,, हसन रुबाब तडवी,राकेशजी सोयाम,शामरावजी उईके ,संजय ठाकुर मुंबई वसंत पावरा, क्रिष्णाजी भंडारी,पी बी कंगाले, भोजराज उईके,व्हि एस खंडाते, विनोद कंगाले,कविता उईके, राज्य ,विदर्भ पदाधिकारी हजर होते त्यांची सोशल मिडीया वर निवडीचे अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव होत आहे. यावर जिल्हाध्यक्षांचे बिरसा फायटर्स चे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी सर्वाचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments