Advertisement

कैलासजी इनवाते मंगेझरी येथे गोंडी विधिवत पध्दतीने नविन घराचे वास्तुपूजन सोहळा व राञी रेणापाटा भजन व गोंडी संगोष्टी नॄत्य व संपन्न.

एसके जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्यूज 
महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 

तिरोडा (१४ जून) कैलासजी इनवाते घोटी मंगेझरी यांचे नविन घराचे वास्तुपुजन कार्यक्रम संपन्न झाले त्यात या  आदिवसी गावात प्रथमच गोंडी संस्कॄती रूढी परंपरा व  बोलीभाषेतून भुमकाद्वारे निसर्ग शक्तीला जागॄत करून   पुजा अर्चा करून घरात प्रवेशाचा सोहळा संपन्न झाला त्यानिमित्य राञी गोंडी भजन नॄत्य व संगोष्ठी  पार पडला त्याप्रसंगी उदघाटक म्हणुन बिरसा फायटर्सचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष भोजराज उईके,जगनजी धुर्वे अध्यक्ष जि जंगल संघ ,बंडू मरस्कोल्हे,कुमार उईके,गिरधारी परतेती, बेनीरामजी पंधरे समाजप्रेमी अगत्याने हजर होते.या कार्यक्रमात तालुका व जिल्हा बिरसा फायटर्स प्रदेश अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांना निमंञित करण्यात आले पण ते आपल्या कौटुंबिक समस्या व कार्यक्रमामुळे  हजर होवू न शकल्याने संदेश पाठवून दिलगिरी व्यक्त केली व जिल्हा गोंदिया वासीयाचे प्रेम असेच राहावे असे वाट्सप व फोन क्राँम्फ्रंसवर बोलतानी मत व्यक्त केले आहे..आपण मला बोलावून संमान केले असेच प्रेम व भावनासम्मांन ठेवावा.असे जिल्हा अध्यक्ष.मा.भोजराज उईके  यांचेशी बोलताने समस्या सांगितली 

Post a Comment

0 Comments