Advertisement

आदिवासी समाजाची बदनामी करणा-या लकी राधा या दाम्पत्यावर नंदुरबार पोलीसांकडून कारवाई सुरू

*बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल*

दापोली: छत्तीसगडच्या आदिवासी समाजामध्ये भाऊ बहिण आपसात लग्न करतात अशा आक्षेपार्ह विडियो द्वारे आदिवासी समाजाची बदनामी करणारे व समाजात तेढ निर्माण करणा-या लकी राधा ह्या नवरा बायको दोघांवर सायबर क्राईम व ऑस्ट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,गृहमंत्री,उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी रत्नागिरी, पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.या मागणीचे निवेदन गणेश खर्डे कार्याध्यक्ष नंदुरबार व इतर पदाधिकाऱी यांनी सुद्धा दिले होते.त्यावर रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक सायबर सेल,पोलीस ठाणे नंदुरबार यांनी गणेश खर्डे कार्याध्यक्ष बिरसा फायटर्स नंदुरबार यांना दिनांक 27/06/2022 रोजी पत्र पाठविले आहे.या चौकशीत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना नंदुरबार पोलीसांचे फोन आले.त्यांनी त्या विडीओची ओरीजिनल लिंक सुशिलकुमार पावरा यांच्याकडून मागून लकी राधा वर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे आदिवासी समाजाची सोशल मिडीयावर बदनामी करणा-यांना चांगलाच धणका बसला आहे.
               लकी राधा ह्या नवरा बायको यांनी moj अँपवर lucky radha @ lucky radha 0 या आयडी द्वारे आदिवासी समाजाला उद्देशून छत्तीसगडच्या आदिवासी समाजामध्ये आपसात भाऊ बहिण लग्न करतात असा एक आक्षेपार्ह विडीओ बनवून इंन्स्टाग्राम व वाटसप अशा सोशल मिडीयावर टाकत संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी केली आहे व आदिवासी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ,संताप निर्माण होईल यासाठी आक्षेपार्ह वाईट पद्धतीने बोलले आहेत.लकी राधा यांच्या ह्या वाईट कृत्याचा आम्ही बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. लकी राधा यांनी लकी आहे जो त्याची बायको राधा ला एक प्रश्न विचारतो की, ऐसी कौनसी जगह है, वहा पर आपस मैं भाई बहिण की शादी होती है? इसपर राधा ने बोला की ,छत्तीसगड के आदिवासी समाज मैं भाई बहिण की शादी होती है "!"असे अश्लील शब्दांत अश्लील कृतीद्वारे आदिवासी समाजाला बदनाम केले आहे.आदिवासी समाज शांत व प्रामाणिक आहे.या शांत समाजाला आपल्या अश्लील विडीओद्वारे जाणीवपूर्वक भडकावण्याचे काम लकी राधा यांनी केले आहे.
                लकी राधा दोन्ही नवरा बायको यांच्या या सोशल मिडीयावरील अश्लील विडीओ मुळे आदिवासी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत व लकी राधा दोन्ही नवरा बायको चा बद्दल आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. लकी राधा दोन्ही नवरा बायको चा विरोधात देशभर आदिवासी संघटनांमार्फत निषेध नोंदवला जात असून फौजदारी कारवाईसाठी मागणी केली जात आहे.तरी आदिवासी समाजबदल अश्लील कृतीतून जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची बदनामी करणा-या,आदिवासी समाजात तेढ व संताप निर्माण करणा-या लकी राधा यांच्यावर सायबर क्राईम व अॅस्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स महा राज्य संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा सुद्धा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे.

Post a Comment

0 Comments