Advertisement

बिरसा फायटर्स तलावडी अध्यक्षपदी हिंमत पावरा यांची निवड करण्यात आली

शहादा: बिरसा फायटर्स तलावडी गाव शाखा सुरू करण्यासाठी दिनांक 4 जून रोजी हनुमान मंदिर तलावडी येथे सभा आयोजित करण्यात आली होती.बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली तलावडी गाव शाखेची कार्यकारणी निवड करून घोषित करण्यात आली.सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व युवकाच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे हिंमत पावरा यांची तलावडी गाव अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.सुशिलकुमार पावरा यांनी हिंमत पावरा यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपाध्यक्ष रमेश पावरा, महासचिव किशोर पावरा , सहसचिव चैत्राम पावरा , कार्याध्यक्ष दिलवर पावरा ,कोषाध्यक्ष दिलीप पावरा, सल्लागार हिंमत रावताळे ,संघटक विलास रावताळे, प्रसिद्धीप्रमुख हिंमत पावरा ,महिला प्रतिनिधी प्रिती रावताळे ,सदस्य म्हणून रेहमसिंग रावताळे ,प्रविण रावताळे ,सूर्यकांत रावताळे यांची निवड करण्यात आली.यावेळी तलावडी गावाचे पोलीस पाटील मोहन रावताळे , गावातील ग्रामस्थ व वरिष्ठ मंडळी उपस्थित होती. संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व ग्रामस्थ यांनी नवीन गाव शाखा कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.
              सभेत सुशिलकुमार पावरा यांनी बिरसा फायटर्स संघटनेविषयी माहिती दिली.बिरसा फायटर्सने केलेल्या कामाचा सुद्धा उल्लेख केला.बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार असून बिरसा फायटर्स संघटनेच्या शाखा आजूबाजूच्या गांवात सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत व सुशिलकुमार पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असे मनोगत नवनिर्वाचित गाव अध्यक्ष हिंमत पावरा यांनी व्यक्त केले.बिरसा फायटर्स संघटनेच्या 213 शाखा पूर्ण झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments