Advertisement

बोराडी येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडांची १२२ वा स्मृतिदिवस साजरा करण्यात आला


  दि.९जून २०२२ रोजी बोराडी येथे शाहूमहाराज हॉल मध्ये क्रांतिसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १२२ वा स्मृतिदिवस चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले 
 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प चे अध्यक्ष डॉ.ना.तुषार भाऊ रंधे यांच्या हस्ते बिरसा मुंडा च्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
   या अभिवादन च्या छोट्याखानी कार्यक्रमाची सुरवात बोराडी जवळील न्यूबोराडी रोड पासून मोटारसायकल रॅली ची सुरवात पं.स. शिरपूर चे सभापती दादासो.सत्तरसिंग पावरा यांच्या हस्ते नारळ फोडून रॅलीस सुरवात करण्यात आली

या प्रसंगी समाजकल्याण सभापतीचे प्रतिनिधि सामजिक कार्यकर्ते श्री.जयवंत पाडवी, माजी उपसभापती जगन पावरा, कोडीद चे सरपंच तथा पोलीस पाटील भरत पावरा, पं.स सदस्य कैलास पावरा, पं.स सदस्य मन्साराम भिल बिरसा ब्रिगेड सातपुडा विभागाध्यक्ष तथा बिलटपाडा चे पोलीस पाटील सुंदरलाल पावरा
व तरुण युवा वरिष्ठांनच्या उपस्थितीत अभिवादन चा कार्यक्रम पार पडला
  कार्यक्रम चे आयोजन नियोजन भाजपा आदिवासी आघाडी चे धुळे जिल्हाध्यक्ष रमण पावरा, पं.स सदस्य विशाल पावरा यांनी केले 
    कार्यक्रमात सभापती सत्तरसिंग दादा पावरा,जयवंत पावरा, रमण पावरा, डॉ.हिरा पावरा यांचे मार्गदर्शन अनमोल राहिले
   प्रास्ताविक व संचालन दशरथ पावरा यांनी केले तर मनोगत आभार जयस महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा यांनी केले

Post a Comment

0 Comments