Advertisement

बिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 10 नवीन शाखा

रत्नागिरी: सुरेशकुमार पंधरे विदर्भ अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा व हिंगोली जिल्ह्य़ात बिरसा फायटर्सच्या एकाच दिवसात 10 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. दिनांक 14 जून 2022 रोजी ह्या 10 नवीन शाखा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी वाॅटसप ग्रुप वर जाहीर केल्या.म्हसवाणी,गायमूख,लोहारा,बोंडे,झाडगाव,खंडाळा,सानगडी, पिंडकेपार,टेकेपार, डोडमाझरी इत्यादीं नवीन शाखा सुरु झाल्या आहेत. नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे बिरसा फायटर्स महाराष्ट्र शाखेने व सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रदेशाध्यक्ष यांच्या या कामाचे कौतुक सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले आहे.बिरसा फायटर्सच्या एकुण 223 शाखा पुर्ण झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments