Advertisement

त्रंबकेश्वर : ग्रामपंचायत माळेगांव मध्ये कामातील भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले ग्रामसेवक सरपंच उपसरपंच प्रशासकीय अधिकारी यांच्या वर तात्काळ मध्ये कडक कारवाई करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता पिंटू रंधे यांनी मुख्यमंत्र्यांना केली


त्रंबकेश्वर : ग्रामपंचायत माळेगांव येथिल दिव्याचापाडा या आदिवासी वस्ती असलेल्या ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला असुन वृद्ध महिला मैलभर दुरवरुन पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन येतांनाचे चित्र परिसरात दिसून येते आहे एकीकडे, राज्यकर्ते मोठमोठ्या घोषणा करतात घराघरात पाणी देऊ पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात बघितले असता परिस्थिती जैसे थे अशीच आहे, आदिवासी ग्रामीण भागाचा कायापालट करायचा असल्यास, मुलभूत सोयी सुविधा, रस्ते, विज, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आदी कामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे, शहरी भागात कोटींच्या कोटी उड्डाणे घेत होणारी विकासकामे बघता ग्रामीण भागातील परिस्थितीत काही ठिकाणी विदारक चित्र दिसत आहे ग्रामपंचायत माळेगांव दिव्याचापाडा, येथील पाणी प्रश्न बघितला असता स्वतंत्र मिळुन ७५ वर्षे पुर्ण झालेली असतानाही, वृद्ध महिला डोक्यावर दोन दोन हंडे घेऊन जाताना दिसतात,

 उमराणेपाडा येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते पिंटु रंधे व त्यांचे सहकारी देविदास भोये, देविदास गावित, यांनी ही विदारक परिस्थिती असलेल्या दिव्याचापाडा पाणी प्रश्नावर तेथील महीलांची विचारपूस केली असता ग्रामपंचायत माळेगांव यांनी पुरवलेले पाणी हे साबण मिक्स असल्याने ते पिण्यासाठी योग्य नाही त्यामुळेच आम्हाला मैल दोन मैल चालत हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते पिंटू रंधे यांनी प्रसिद्धी प्रमुख शी बोलतांना सांगितले की, उंबरणेपाडा येथे झालेल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून सुरु असलेले कामेही दर्जाहीन स्वरुपाची सुरू आहे ग्रामीण भागातील कामांमध्ये असलेल्या टक्के वारीच्या खेळामुळे, व सर्व मिळून खाऊ यामुळे विकासकामांचा दर्जा खालावलेला आहे सरकारला व विरोधीपक्षांना आमची हातजोडून विनंती आहे की ग्रामीण भागात केंद्रसरकार व राज्य शासनाने पाठवलेला निधीचा विनियोग योग्य प्रकारे होऊन दर्जेदारष सोईसुविधा ग्रामीण आदिवासी भागातील रहिवाशांना उपलब्ध करून देण्यात याव्यात आमच्या भागातील ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या कामातील भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच,प्रशासकीय अधिकारी लोक यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते पिंटू रंधे यांनी यावेळी केली आहे.

Post a Comment

0 Comments