Advertisement

पुणे - आ.किरणजी लहामटे यांची अधिछात्रवृत्ती (fellowship) चालू करण्यासाठी भेट

दि १८ एप्रिल सोमवार रोजी अकोले विधानसभा आमदार किरणजी लहामटे यांची बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने भेट घेऊन आदिवासी पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (fellowship) चालू करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले की राज्यात नामांकित विद्यापीठात किमान ५०० आदिवासी विद्यार्थी पीएचडी चे संशोधन करत आहेत विद्यार्थी सर्व सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना आर्थिक अडचण येत आहे. तरी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे संस्थेकडून अधिछात्रवृत्ती चालू केल्यास त्यांना मदत होईल विद्यार्थी मागास दुर्गम डोंगराळ भागातील असून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याची निंतात गरज आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी शासनाकडे दि. १७-०३-२०२२ रोजी प्रस्ताव दिला आहे यावर योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती उपलब्ध करुन देण्यात यावी यावेळी बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव आदि चिंधूजी आढळ ,पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष हरिभाऊ तळपे ,सचिव शशिकांत आढारी,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संतोष बोटे, आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाळकोळी ,उपाध्यक्ष सागर भवारी सर, चाकण शहर अध्यक्ष बारकू ठोकळ, भिमराव भोकटे, किसन केंगले इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments