Advertisement

मा.उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार मंत्री ना.छगन भुजबळ, ना. वडट्टेवार यांची आरक्षण हक्क कृती समितीशी चर्चा..

मुंबई- मा. सर्वोच्च न्यायालयाचे दि.28/1/2022 चे आदेश व त्यानुसार केंद्र सरकार (DoPT) ने दि 12/4/2022 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील मागासवर्गीयांचे थांबविलेले 33% आरक्षण सुरू करावे या बाबत सकारात्मक चर्चा होऊन,उद्या कॅबिनेट असून मा. मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून आरक्षण हक्क कृती समिती बरोबर बैठकीची तारीख निश्चित करण्याचे आणि मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण सुरू करण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे मा. मंत्री महोदयांनी दि.19/4/2022 रोजी दुपारी मंत्रालयातील मा.उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या दालनात व समिती कक्षात मंत्री ना. छगन भुजबळ , ना. वडट्टेवार यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. महाराष्ट्रातील 230 मागासवर्गीय संघटनेच्या आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले. समितीच्या शिष्ट मंडळामध्ये माजी खासदार हरिभाऊ राठोड, सुनिल निरभवने, अरुण गाडे, एस के भंडारे, सिध्दार्थ कांबळे, आत्माराम पाखरे, डॉ संजय कांबळे बापेरकर, एड. राकेश राठोड, कृष्णा पराड, दिपक मोरे, जमदाडे मॅडम, सुषमा मोरे इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. जर आठ दिवसात बैठक झाली नाही तर आम्ही 1मे - कामगार दिनी आंदोलन करणार असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांना सांगितले.

एस के भंडारे
*राज्य समन्वयक*
*आरक्षण हक्क कृती समिती*

Post a Comment

0 Comments