Advertisement

तिरोडा: येथे संसुक्ती शेतकरी विकास आघाडीचे झेंडा व विविध कार्यकारी निवडणूक नुकतीच पार पडली

संयुक्त शेतकरी विकास आघाडी चा झेंडा तिरोडा :-विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था धादरी /उमरी चे निवडणूक नुकतीच पारपडली असून या निवडणुकीत संयुक्त शेतकरी विकास आघाडी चा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत सरपंच मा. अजितभाऊ ठवरे यांनी मध्यस्थी करून उपरोक्त आघाडी निर्माण करून श्री. चुन्नीलालजी पटले, संतोष लिल्हारे, सरपंच साहेब यांच्या नेतृवात निवडणूक लढवून खालीलप्रमाणे उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती /जमाती गटातून श्री. अजितकुमार ठवरे, कर्जदार गटातून सर्व श्री. चुन्नीलाल पटले, पवन पटले, दीनदयाल पटले, दिंगबर पाटील, राजेंद्र लिल्हारे, रोशन लिल्हारे, यशवंत पटले, इतर मागासवर्ग गटातून श्री. सुरेश पाटील, महिला गटातून सौ. माल्हन बाई नागपुरे व हिरुबाई पटले हे विजयी झाले. संयुक्त शेतकरी विकास आघाडी द्वारे सर्व मतदार बंधू /भगिनी यांचा आभार व्यक्त करण्यात आलेला आहे. सर्व मतदारांचे लक्ष आता कौन अध्यक्ष होते यांच्या कडे लागले आहे.

Post a Comment

0 Comments