Advertisement

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक मा.कैलास पगारे (भाप्रसे) यांचे डायट प्राचार्य डॉ अनिल गौतम यांचे वतीने स्वागत

राज्य प्रकल्प संचालक मा.कैलास पगारे हे नाशिक येथे आढावा बैठक साठी आगमन झाले.त्यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ अनिल गौतम यांनी भेट घेऊन स्वागत केले. यावेळी समवेत समग्र शिक्षा चर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे उपस्थित होते.
राज्य प्रकल्प संचालक यांचे प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमाचा सि एम सि कॉलेज येथे आढावा घेतला जाणार आहे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जेष्ट अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी विस्तारधिकारी, साधनव्यक्ती,विशेष शिक्षक आदींचा आढावा घेतला जाणार आहे.या बैठकीत निपुण भारत अभियान,खासगी शाळांमध्ये इंग्रजी प्रयोगशाळा सुरू करणे,ग्रामिण भागातील शाळांमध्ये इंग्रजी प्रयोगशाळा सुरू करणे आदींबाबत बैठकीत चर्चा व आढावा घेतला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments