Advertisement

दापोली:ए.जी.हायस्कूल प्रशालेमध्ये कला प्रदर्शन संपन्न

 दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी.हायस्कूल मध्ये कला व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'कल्पककला' संबोधित कला व विज्ञान प्रदर्शन अतिशय उत्साहात पार पडले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश समोर ठेवून सदरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी क्विलींग पासून विविध प्रकारच्या वस्तू व इमिटेशन दागिने, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तसेच विविध प्रकारची विज्ञान विषयक माॅडेल्स तयार करून आपल्या कलेचे प्रदर्शन केल्याचे दिसून आले. याप्रसंगी प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय समिती चेअरमन सौ. निलिमा देशमुख यांच्या हस्ते झाले. 
सदर प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी  विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक श्री. श्रीराम महाजन, ॠतुजा दाबके, प्रिया पाष्टे, संतोष येलवे व पंकज रेमजे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 
तसेच शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी सुध्दा प्रदर्शनास भेट देऊन  विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि  प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सतीश जोशी, उपमुख्याध्यापक श्री.शरद कांबळे, पर्यवेक्षक श्री. सिद्राम माळी व संजय तलाठी यांनी आपली उपस्थिती दर्शवित विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments