साकोली (३०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती पुर्व संध्येला महाराष्ट्र दिनाचे अौचित्य दिशा बहूउदेद्शीय संस्थाच्या सौजण्याने यंदाचा सामाजिक,साहित्यिअक, शैक्षणिक,कला पञकारिता,पर्यटन, व ग्राम पंचायत स्तरावर कार्य समर्पीत भावनेने व निस्वार्थेपने केलेले
उल्लेखनिय कार्यासाठी,दखल घेवून पुरुषोत्तम जी रूखमोडे यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने गौरवि ण्याययात आले म्हणुन मुख्य संपादक शशिकांत शिंदे महाराष्ट्र लाईव्ह न्युजच्या वतीने सामाजिक न्याय भवन भंडारा येथे प्रकाश पोहरे मुख्य संपादक देशोन्नती,वॄतपञ मा.संदिप कदम जिल्हाधिकारी भंडारा,मा.वसंत जाधव, पोलिस अधिक्षक,खिमेश बढिये स्तभलेखक,चेतना भैरव जिल्हा प्रतिनिधी,मिलिंद वानखेडे,शिक्षक नेते, यांचे हस्ते स्मॄर्ती चिन्ह व शाल श्रीफळ देत मानांकित करण्यात आले. याबद्ल मिळालेल्या पुरस्कारासाठी त्यांनी अवघ्या एका वर्षात सर्व क्षेञात ग्रामविकासात भरीव कार्य करित गावाला जिल्हा व राज्यस्तरावर अनेक स्वच्छेतेच्या बाबतीत पुरस्कार मिळविण्यात स्पर्धात गावाला अव्वल स्थान मिळवून दिले
या कामासाठी त्यांनी जिल्हा सरपंच परिषद समन्वयक तसेच ग्राम विकास अधिकारी रमेेेेश झोडे वडेगांवचे सचिव एस हातझाडे शिवनकर, सचिवजी, पोलिस पाा शंकर कापगते, पाटील, उपसरपंच सत्यपाल. मरस्कोल्हे, गटविकास अधिकारी ,यांचे कडून मार्गदर्शन घेवून वेळोवेळी पञकार यांची मदत घेत कार्य करण्यापेक्षा प्रसिध्दि न मिळविता उतुंग कार्य करित तुकारामाच्या उक्ती व युक्तीने" नीच कॄती लाजो नये वैभव होता माजो नये "असे ध्येय धोरण आखत खालच्या घटकापासून आरोग्य शिक्षण,सिंचण,पाणी आडवा पाणी जिरवा ,सर्व क्षेञात अग्रेसर राहत कार्य रेटून धरले कुणाच्याही गरिब श्रीमत असो किंवा अतिक्रमन हटवून मतभेदाची वा तक्रारीची पर्वा न करता चार गावाची गटग्रामपंचायत असतांनी सुध्दा सर्वाना एकच न्याय व तत्वाच्या अधिन राहून काम केले. त्यांच्या मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वञ अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर शोसल मिडीयात व प्रत्यक्ष भेटून वा संदेश देवून होत असल्याचे त्यांनी प्रसार माध्यम फेसबुक,वाट्सप वर शेअर केलेल्या संदेशात म्हटले आहे.व त्यांनी मिळालेले पुरस्कार ग्रापंला समर्पित करित असल्याचे म्हटले व यांचे श्रेय त्यांनी ग्रा प सदस्य,पदाधिकारी,गावकर्यांनी दिलेल्या सहकार्याने सहज झाल्याचे म्हटले आहे.सरपंच परिषद मुबई जिल्हा महाराष्ट्र शाखा समन्वयक सुरेशकुमार पंधरेनी फोनवर शुभेच्छा दिल्या व वेळोवेळी आपली संघटन सहकार्य करेल फोनवर व संदेशात असे म्हटले आहे.
0 Comments