Advertisement

राखी सावंत बिगडी औरत अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार: सुशिलकुमार पावरा


दापोली:"भूम भूम टरा रारा" करत आदिवासी समाजाला अपमानित करणा-या राखी सावंतविरोधात आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे.राखी सावंत ही बिघडलेली बाई आहे.संपूर्ण मानव समाजाला कलंकित करेल,असे तिचे कृत्य आहे.आपल्या अश्लील कृत्याने माणसांना बिघडवण्याचे काम राखी सावंत करत आहे.स्त्रीयांमध्ये लाज,लज्जा,सभ्यता हे गुण असतात ते गुण राखी सावंत मध्ये नाहीत.राखी सावंत बेशरम बाई आहे.पैशांसाठी काहीही करायला तयार असणारी ही बाई आहे.भूम भूम करत जो विडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकण्यात आला आहे,तो विडीओ सुद्धा सोशल मिडीयावरून पैसे कमवायलाच तयार केला आहे.या विडीओ द्वारे राखी सावंतला पैसे तर नाही मिळणार पण लोकांचा विरोध, संताप, निषेध, शापच मिळणार आणि तो तिला मिळत आहे.राखी सावंतने अश्लील विडीओ कुठल्याही समाजाचा आधार घेऊन बनवू नयेत. तिच्या अश्लील कृतीमुळे संपूर्ण आदिवासी समाजात व संघटनांत संताप निर्माण झाला आहे,म्हणून तिने लवकरात लवकर आदिवासी समाजाची सार्वजनिक माफी मागावी आणि पुन्हा असे आदिवासी समाजाला उद्देशून अश्लील विडीओ बनवू नयेत, याचे गंभीर परिणाम होतील.अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.
                आमचा आदिवासी समाज हा शांत समाज आहे.आदिवासी समाजाला अपमानित करणा-या व्यक्तीविरोधात आम्ही कदापी शांत बसणार नाहीत. आदिवासी समाज संपूर्ण मानवजातीचा विकास करणारा,भारतीय संस्कृती जतन करणारा व संस्कृती वाचवणारा समाज आहे.या समाजाबद्दल काहीही बोलणा-या व्यक्तींना आम्ही माफ करणार नाहीत. राखी सावंत हिने आपल्या अंगप्रदर्शन द्वारे आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती,अस्मिता अस्तित्व याला ठेस पोहचवली आहे.आदिवासी समाजाला जाणीवपूर्वक ढिवचण्याचे काम केले आहे.तिच्या अश्लील कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.राखी सावंत विरोधात आम्ही बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.अध्यक्ष अनुसूचित जाती व जमाती आयोग व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी कल्याण समिती याच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन दिली आहेत. त्यामुळे राखी सावंतवर कायदेशीर कारवाई होईलच.
          संपूर्ण आदिवासी समाजाला मी आवाहन करतो की, आदिवासी समाजाला अपमानित करणा-या कलाकारांचा तीव्र विरोध करावा,निषेध नोंदवावा,कारवाई साठी आवाज उठवावा.सोशल मिडीयावर यांचे विडीओ बघणे बंद करावेत, जेणेकरून यांचे विव्हर्स,युजर्स,लायकर्स कमी होतील आणि यांना सोशल मिडीयाकडून मिळणारा पैसा बंद होईल, यांचे धंदे बंद होतील, तरच यांना अक्कल येईल.ईट का जवाब पत्थर से दो! अशा शब्दांत सुशिलकुमार पावरा यांनी राखी सावंतचा निषेध नोंदवत तिव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

0 Comments