Advertisement

शेतकरी मेळावा आदिवासी महिलांचे आरोग्य व शेती विषयावर शिरपूर तालुका चाकडू गाव येथे शेतकरी बांधव व महिलांना बायफ मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.



 दिनांक ३० मार्च रोजी चाकडू तालुका शिरपूर येथे नाबार्ड पुरस्कृत बायफ मित्र संचलित टी.डी.एफ वाडी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा आदिवासी महिलांचे आरोग्य व शेती विषयावर चाकडू येथे शेतकरी बांधव व महिलांना बायफ मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. त्याप्रसंगी उपकेंद्र कोडीद येथील आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आदिवासी प्रकल्प सदस्य(धुळे)श्री.अत्तरसिंग पावरा, बायफचे सर्व अधिकारी व कर्मचारी, आरोग्य सेविका श्रीम.प्रमिला गिरासे, आरोग्य सेवक ए.पी.नेटके, चाकडू येथील कार्यरत आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते दिवाणसिंग पावरा, प्रकाश पावरा, बाप्पू पावरा आदी शेतकरी व ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.




    ह्यावेळी महिलांना सदर टीम अंतर्गत मेळाव्यात आलेल्या महिलांना सेनेटरी पॅड वाटप केले व आरोग्य सेविका ह्यांनी ह्याचे वापरचे महत्व सांगितले व आरोग्यवर्धक टॉनिकच्या मेडिसिन वाटप करण्यात आले.



Post a Comment

0 Comments