Advertisement

शहाद्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना पदावरून हटविण्याची आदिवासी महिलांची मागणी


जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन, उपोषणाचा इशारा

शहादा प्रतिनिधी : महिलेवर लैंगिक अत्याचार व विनयभंग करून खाकी वर्दीला डाग लावणारा,शहादा तालुक्यात आदिवासी महिला व बालकांना रात्री बेरात्री घरात घुसून त्रास द्यायला लावणारा व बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न प्रकरणात आरोपी असणारा वादग्रस्त हेमंतकुमार पाटील पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा यांच्या वर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा, सेवेतून बडतर्फ करा, पदावरून तात्काळ हटवा, अशी मागणी जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर एकूण ४० महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रभूदत्तनगर, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात दिनांक ८/८/२०२६ रोजी रात्री १० ते ११ वाजे दरम्यान  विना वर्दीत व चेहऱ्यावर मास्क/रुमाल बांधून कोणतेही कारण न सांगता घरात घुसणा-या शहादा पोलीस ठाण्यातील संबंधित ७ ते १० पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याबाबत तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सदर प्रकारामुळे सुशिलकुमार पावरा यांच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वीही विना वर्दीत रात्री घरात घुसून या संशयित पोलिसांनी वस्तूंची चोरी केली आहे.
                     वादग्रस्त हेमंतकुमार पाटील पोलिस निरीक्षक शहादा यांच्या वर धुळे येथे असताना त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान (IPC) कलम ३५४ (अ), ३५४ (ब), ३५४ (ड), ५०९, ५०६, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६७, ६७ (ए) अन्वेषणांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत  हे फरार होते.निलंबित होते.महिलेच्या बाबतीत लैंगिक अत्याचार/विनयभंग केल्याचा गंभीर आरोप असून, आरोपी पोलिस अधिकारीला पोलिस निरीक्षक या पदावर पुनर्नियुक्ती कशी काय देण्यात आली? वादग्रस्त हेमंतकुमार पाटील पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा हे मला पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न प्रकरणात आरोपी आहेत.केस नंबर ४११/२०२५ नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची शहादा पोलिस ठाण्यात नेमणूक करू नका म्हणून आम्ही आदिवासी संघटनांकडून दिनांक १०/०१/२०२६ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांना यापूर्वी अनेक निवेदन दिले आहेत व आंदोलन सुद्धा झाले आहे.हेमंतकुमार पाटील यांच्या वर कारवाई न झाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा आदिवासी महिलांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments