Advertisement

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका -बिरसा फायटर्सची मागणी


शहादा प्रतिनिधी :- शिक्षकांना जनगणना व बीएलओ (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) व इतर अशैक्षणिक कामे देऊ नये , अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, शिक्षणाधिकारी नंदुरबार व गटशिक्षणाधिकारी शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                निवेदनात म्हटले आहे की ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव ता शहादा जिल्हा नंदुरबार या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत चे वर्ग असून ५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ४ शिक्षक कार्यरत आहेत.परंतू जनगणना, बीएलओ व इतर शैक्षणिक कामांमुळे त्यांना शाळा ऐवजी इतर आफीस व  ठिकाणी काम करावे लागते.यामुळे शाळेतील शिक्षक अध्यापन व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.निवडणूक आयोगाने (ECI) जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार, शिक्षकांना बीएलओ (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून काम  करायचे आहे.त्यानंतर जनगणना हेही काम करायचे आहे.या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांच्या मूळ अध्यापनावर आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा ताण येत आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊच नये.कारण त्याचा अध्यापनावर व‌ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो.म्हणून शिक्षकांना बीएलओ (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) व जनगणना अशी अशैक्षणिक काम देऊ नये , अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments