Advertisement

शहाणा बर्डीपाडा शाळेत एकच शिक्षक; गुणवत्ता ढासळली; शिक्षक नेमणूकीची बिरसा फायटर्सची मागणी


मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन

शहादा प्रतिनिधी :- जिल्हा परिषद शाळा शहाणा बर्डीपाडा येथे शिक्षक नेमणूक करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, शिक्षणाधिकारी प्राथमिक व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
               निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषद मराठी शाळा शहाणा बर्डी ता. शहादा जिल्हा नंदुरबार येथे मागील  ८ ते ९ महिन्यांपासून एकच शिक्षक कार्यरत आहे. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून एकूण ३५ पटसंख्या आहे . शैक्षणिक  वर्ष २०२५ ते २०२६ पर्यत जावदे केंद्रात या शाळेची शिक्षणाची प्रगती  प्रथम व द्वितीय क्रमांक आहे.आता शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  म्हणून जिल्हा परिषद शाळा शहाणा बर्डीपाडा येथे तात्काळ शिक्षक नेमणूक करण्यात यावे ,हीच नम्र विनंती.अन्यथा पालक व गावकरी येत्या ८ दिवसांत आंदोलन करणार आहेत.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments