ठेका रद्द करण्याची बिरसा फायटर्सची मागणी
शहादा प्रतिनिधी : नंदुरबार जिल्हयात गेल्या ३० वर्षापासून निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य पुरवठा करणाऱ्या श्री. प्रकाश आस्करंद जैन, इंदिरा ट्रान्स्फर, शहादा यांचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नंदुरबार जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक, गरीब व गरजू रेशनकार्डधारक तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सार्बजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून शासनाकडून अनधान्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, श्री. प्रकाश आस्करंद जैन, इंदिरा ट्रान्स्फर, शहादा यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून निकृष्ट दर्जाचे, खराब व लाभार्थ्याच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे रेशन धान्य पुरवठा करण्यात येत असल्याबाबत नागरिकांकडून गंभीर तक्रारी प्राप्त होत आहेत.रेशन धान्य हे गरीब व गरजू नागरिकांच्या जीवनावश्यक गरजांशी संबंधित असून, त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणे अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पुरवठा करण्यात आलेल्या धान्याची गुणवत्ता, साठवणूक, वाहतूक, वितरणाची पद्धत, शासकीय नियम व करारातील अटींचे पालन तसेच मागील ३० वर्षातील संबंधित कामकाजाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
श्री. प्रकाश आस्करंद जैन, इंदिरा ट्रान्स्फर, शहादा यांच्याकडून नंदुरबार जिल्हयात करण्यात आलेल्या रेशन धान्य पुरवठ्याची मागील ३० वर्षाची सखोल चौकशी करण्यात यावी.संबंधित ठेकेदाराने पुरवठा केलेल्या धान्याचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेमार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी.धान्य निकृष्ट दर्जाचे आढळल्यास तसेच शासनाच्या नियम व करारातील अटींचे उल्ल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा.दोषी आढळणान्या संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी-कर्मचान्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यत लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.भविष्यात लाभार्थ्यांना शासनाच्या गुणवत्तानुसार स्वच्छ, सुरक्षित व दर्जदार रेशन धान्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी कठोर नियंत्रण व गुणवत्ता तपासणी व्यवस्था लागू करण्यात यावी. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments