मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व पोलिस ठाणे आझाद मैदान मुंबई यांना निवेदन
नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सह पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दूरूपयोग करून मनमानी, असंवेधानीक, बेकायदेशीर रित्या आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सर्व सामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरोधातल्या मागण्यांसाठी सुशिलकुमार पावरा यांचे आझाद मैदान मुंबई येथे दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून ५०९ वे उपोषण होणार आहे.उपोषणाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस ठाणे आझाद मैदान मुंबई यांना सुशिलकुमार पावरा यांनी दिले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने, भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणा-या भ्रष्ट, अकार्यक्षम, आदिवासी विरोधी, गुंड प्रवृत्तीच्या पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. ९ सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा व वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा. नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाणे नंदुरबारचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा.
आदिवासी पिडीत तक्रारदार व आदिवासी महिलांची तक्रार नाकारत तक्रारदारालाच शिवीगाळ करून मारहाण करून लाक अप मध्ये बंद करून ठेवणा-या, आरोपींना वाचवण्यासाठी तक्रारदाराची तक्रार नाकारत गैरवर्तन करणाऱ्या पोलिस निरीक्षक निलेश देसले यांना ४/४/२०२५ रोजीच्याचौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा. गेल्या ३ वर्षांपासून एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न देणाऱ्या व आदिवासींची सर्वच प्रकरणे दडपणा-या, अवैध्य धंद्यांना साथ देणा-या उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना सेवेतून निलंबित करा.करा. नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा मटका, जुगार, दारू, गुरखा, गांजा, असे अवैद्य व्यवसाय बंद करा. तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेणाऱ्या धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा. रात्री विना वर्दीत घरात घुसून चोरी करणाऱ्या, दरोडा टाकणा-या शहादा पोलिस ठाण्यातील प्रविण सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक, युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दिपक चौधरी सह पोलिसांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व दरोडेखोर पोलिसांना सेवेतून बडतर्फ करा.


0 Comments