Advertisement

त्या आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांना नोकरीतून काढा - बिरसा फायटर्सची मागणी


गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री विजय थलापती यांना निवेदन

नंदुरबार प्रतिनिधी:- एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अपहरण करून बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली.या प्रकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तामिळनाडूच्या आयजी तथा आयपीएस पोलिस अधिकारी रम्या भारती समवेत बाजूला बसलेले दोन आयपीएस पोलिस अधिकारी खदा खदा हसत असल्याचा एक विडीओ सोशल मिडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.या आयपीएल पोलिस अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाका, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.                      या असंवेदनशील आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करीत आहेत.संपूर्ण भारत भर या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.भारत बरेच आयपीएस अधिकारी निर्माण झाले आहेत जे नेत्यांच्या इशा-यावर सामान्य माणसांवर खोटे गुन्हे दाखल करतात, लोकांवर अन्याय व अत्याचार करतात,अपराध वाढवतात व कायदा , सुव्यवस्था तसेच शांतता बिघडवतात.१० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आले आहे,अशा प्रकरणात हे आयपीएस पोलिस अधिकारी खदा खदा हसत आहेत,मजाक करत आहेत.अशा पोलिस अधिकाऱ्यांना लाज का नाही वाटत.हे माणसं आहेत की जनावरे आहेत,असा प्रश्न निर्माण होतो.अशा पोलिस अधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा आपण करू शकत नाही. 
                   नंदुरबार जिल्ह्यात जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मूक मोर्चाला तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी षडयंत्र पूर्वक दंग्याचे स्वरूप देऊन अनेक निरपराध आदिवासी लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक केले.काहींना पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न केला.८ महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला.आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दूरूपयोग केला.अशा पोलिस अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलिस खाते बदनाम होत चालले आहे.पोलिसांची वर्दी कलंकित होत आहे.जनतेचा पोलिसांवरील विश्वास नाहीसा होत आहे.म्हणून अशा नालायक व असंवेदनशील आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ नोकरीतून काढून टाकले पाहिजे,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments