Advertisement

हत्या व हत्येचा प्रयत्न आरोप असणा-या पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा -बिरसा फायटर्सची मागणी


मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन

नंदुरबार प्रतिनिधी:हत्या ,हत्येचा प्रयत्न सारखे गंभीर आरोप असणारे तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक मुंबई, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे.
                 निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील पोलिस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या वर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिनांक ३०/०९/२०२५ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय नंदुरबार यांच्या समोर नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, सरकारी रुग्णालय नंदुरबार यांनी दिलेल्या रिपोर्ट मध्ये सुशिलकुमार पावरा यांना मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.या आरोपी पोलिसांविरुद्ध नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. आरोपी पोलिस अधिकारी हे फिर्यादी सुशिलकुमार पावरा यांच्या केस मागे घेण्यासाठी दबाव टाकून त्रास देत असताना सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांची जहांगीर फेंदा पावरा यांची हत्या करण्यात आली.या हत्येमागे या संबंधीत आरोपी पोलिसांचा हात असल्याचा आरोप फिर्यादी सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.आरोपीत पोलिस अधिकारी यांनी आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दूरूपयोग करून सुबुद्धीने , सुपारी घेऊन हत्या व हत्येचा प्रयत्न सारखे गंभीर गुन्हे केलेले आहेत.अशा पोलिस अधिकाऱ्यांमुळे गृहविभागाची बदनामी होत असून जनतेचा पोलिसांवरील विश्वास नाहीसा झाला आहे.कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत.

Post a Comment

0 Comments