Advertisement

भ्रष्टाचाराची ऐशी की तैशी; तळोदा तालुक्याचा बोर्ड धडगांव तालुक्यातील गौ-या गावातील रस्त्याला!



७ वर्षांपासून बोर्ड कसा काय दिसला नाही?

बांधकाम विभागाचा अजब कारभार;बिरसा फायटर्स संघटनेकडून चौकशीची मागणी

धडगाव प्रतिनिधी:- पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सन २०१७-२०१८ ,कामाचे नाव चौगाव ते माल खु.रापापूर (गोरमाळ) ता.तळोदा लांबी ५/०० कि.मी., अंदाजित रक्कम ३४३...लक्ष ( अंक खोडलेले) ह्या कामाचे भूमिपूजन दिनांक २०१९ रोजी माननीय खासदार डॉ.हिनाताई गावीत , खासदार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ यांच्या शुभहस्ते करण्यात संपन्न. अशा आशयाचा बोर्ड धडगाव तालुक्यातील गौ-या ते चूलवड या रस्त्यावर लावण्यात आला आहे.तळोदा तालुक्यातील चौगाव ते राजापूर गावाच्या रस्त्याचा बोर्ड बांधकाम विभागाने धडगाव तालुक्यातील गौ-या ते चूलवड रस्त्यावर का लावला? या मागे काय गौडभंगाल आहे? अशी उलटसुलट चर्चा जनतेत रंगू लागली आहे. तळोदा तालुक्यातील रस्ता कामाचा बोर्ड धडगाव तालुक्यातील गौ-या रस्त्यावर कोणी व का लावला?अशी शंका वर्तवली जात आहे.
                   धडगाव तालुक्यातील गौ-या ते चूलवड रस्त्यावरील पुलांचे काम हे संबंधित ठेकेदार पावसाळ्यात सुरू करतात आणि पावसाळा संपला की बंद करतात, गेल्या ३ वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण आहे,ही परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या बिरसा फायटर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हा अनाधिकृत बोर्ड दिसून आला.या बोर्डची सखोल चौकशी करून संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झाले किंवा नाही? याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे केली आहे.गेल्या ७ वर्षांपासून हा बोर्ड परिसरातील आदिवासी बांधवांना कसा काय दिसला नाही,असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments