अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या वर हत्या व जातीयवादाचे गंभीर आरोप!
नंदुरबार प्रतिनिधी:- हत्येचे गंभीर आरोप असणारा जातीयवादी व वादग्रस्त अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करा व नार्को टेस्ट घ्या,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, वादग्रस्त व जातीयवादी अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे यांच्या वर खालील गंभीर आरोप आहेत.बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक अश्लील व वाईट शिविगाळ करत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला, त्यातील मुख्य आरोपी आशिष कांबळे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार हा आहे.नंदुरबार जिल्हा न्यायालयात केस सुरू आहे."जय वळवी" या आदिवासी तरुणाची नंदुरबार येथील हत्याकांड मधील संशयित आरोपी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आहे . मुख्य आरोपी व १ पोलिस जो नाशिक सेंट्रल जेल मध्ये बंदीस्त आहे. या हत्याकांड प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्येमागे संशयित आरोपींपैकी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे हा एक आरोपी आहे.कारण सुशिलकुमार पावरा यांच्या वर नंदुरबार पोलिसांचा अत्याचार सुरू असताना त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. अशे गंभीर आरोप वादग्रस्त व जातीयवादी अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे यांच्या वर आहेत.
तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडेंच्या विरोधात बिरसा फायटर्स सह अनेक आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर तब्बल ३४ दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले होते.शहादा तालुक्यातील खैरवे भडगांव येथील पोलिस पाटील धनराज उत्तम पान पाटील हा आदिवासी महिलांना व तरूणांना घरात घुसून मारहाण करतो,या तक्रारीवरून पोलिस पाटीलला पदावरून हटवा,या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेसह काही आदिवासी संघटनांनी प्रांत अधिकारी शहादा कार्यालयासमोर आंदोलन केले होते.या दोन्ही प्रकारात तक्रार मागे घेतली नाही म्हणून बदलेच्या भावनेनं मला पोलिस कोठडीत आशिष कांबळे अपर पोलीस अधीक्षक सह आरोपींनी शिवीगाळ करत अमानुषपणे करून हत्येचा प्रयत्न केला.त्यानंतर प्रविण सोनवणे सहायक पोलिस निरीक्षक शहादा यांच्यासह आठ ते दहा पोलिसांना माझ्या घरात विना वर्दीत घूसून उपोषणाचे निमित्त दाखवून अटक केली व पुन्हा खोटा व बनावट गुन्हा दाखल केला,केवळ जातीच्या नावाखाली आमच्यावर या पोलिसांनी आमच्या अत्याचार केला, हे आदिवासींचे सायलेन्स किलर आहेत,असा गंभीर आरोप बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.


0 Comments