Advertisement

शेतकऱ्यांना शेती कामांसाठी प्राधान्याने पेट्रोल व डिझेल द्या - बिरसा फायटर्सची मागणी



नंदुरबार प्रतिनिधी: शेतकऱ्यांना शेती कामांसाठी प्राधान्याने पेट्रोल व डिझेल मिळावे, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, पप्पू अवाया,जगदीश डुडवे, लक्ष्मी पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                 निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे.शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू. म्हणून शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी प्राधान्याने पेट्रोल व डिझेल मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या इंधन टंचाईच्या काळात, राज्य सरकारने पेट्रोल पंपांना निर्देश पाहिजेज. शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय (उदा. सातबारा सक्ती) आणि विनाअडथळा डिझेल उपलब्ध करूनद्यावे. डिझेल देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सातबारा मागणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात यावी.शेतकऱ्यांच्या नावाखाली इंधनाची साठेबाजी होणार नाही, याकडेही प्रशासनाचे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना डिझेल नाकारले जात असेल, तर पेट्रोल पंप चाच परवाना रद्द करण्यात यावा.तरी शेतकऱ्यांना शेती कामांसाठी प्राधान्याने पेट्रोल व डिझेल देण्यात यावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments