बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि ग्रामस्थांची दिशाभुल केली असल्याचा बिरसा फायटर्सचा आरोप!
शहादा प्रतिनिधी :- शहादा तालुक्यात आडगाव ग्राम पंचायतीत शासकीय निधी अपहार, कागदोपत्री खोटे दप्तर तयार, निकृष्ट व न झालेल्या कामाच्या उच्च स्तरीय चौकशी व तांत्रिक पुराव्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या कडे दिनांक १८ जून २०२६ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी योगेश रावताळे, दिनेश पवार, वीर सिंग पवार, दिपक पवार, अजित पवार, सहदेव पवार, किरण पवार, जितेश पवार, कैलास रावताळे आदी उपस्थित होते.
दिनांक ७ जुन २०२६ रोजी आडगाव ग्रामपंचायतीत पेसा आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैर व्यवहार? ग्रामसभेला हरताळ फासत सरपंच, ग्रामपंचायत अधिकान्यांची मनमर्जी; चौकशी करून सरपंच पदच्युतीची मागणी गावकऱ्यांनी केली.त्यानंतर शहादा पंचायत समितीच्या समितीने आडगाव ग्रामपंचायतीत जाऊन तक्रारदार बिरसा फायटर्स कार्यकत्यांना न बोलवता अंधारात ठेवून कागदपत्राची तपासणी केली.आडगाव ग्राम पंचायतीत भ्रष्टाचाराची कागदपत्रे व दमर मॅनेज करून सगळे हिशोब क्लियर आहेत असा खोटा अहवाल बनवण्याच्या प्रयत्न सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे .वास्तविकता पाहता प्रत्यक्ष जमिनीवर कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकता सिद्ध आम्ही आपणास खालील सहा तांत्रिक व कायदेशीर प्रश्न उपस्थित करून त्यांची लेखी उत्तरे व संबंधित कागदपत्रे आम्हाला तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी केली आहे. मोजमाप पुस्तिका व तांत्रिक तपासणी कोणत्या तारखेला केली?जिओ टॅगिंग व फोटोग्राफ्स चे रेकार्ड,ई मस्टर व मजूर चे पेमेंटचे रेकार्ड,साहित्य खरेदी व जीएसटी बिले, ग्रामसभा ठराव व इतिवृत्त ,स्थळ पाणी अहवालाची माहिती मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे .


0 Comments