भाजप नगरसेवकाच्या मागणीला बिरसा फायटर्स़,भील वंश ग्रूपचा विरोध!
शहादा प्रतिनिधी:- शहादा नगरपालिकासमोरील जागेवर "वीर एकलव्य चौक" नामकरण करून वीर एकलव्य यांचे स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी करत शहादा नगरपालिकाचे भाजप पक्षाचे जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी यांचा बिरसा फायटर्स़ व भिल वंश ग्रूप शहादा कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.मागणीचे निवेदन शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, शहादा तालुका पदाधिकारी सुरेश पवार,जगदीश डुडवे,रामदास मुसळदे ,भील वंश ग्रूपचे योगेश मोगरे, दिपक मोगरे , निलेश सोनवणे ,प्रदिप नगसरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा नगर पालिका समोरील चौकास "वीर एकलव्य चौक" नामकरण करणे बाबतचे निवेदन आपणास दिनांक २८/०२/२०२२ रोजी ओम साई ग्रूप, श्रीराम युवा सेना, भगवान एकलव्य ग्रूप,भील वंश ग्रूप शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.त्याऊलट भाजप पक्षाचे शहादा नगरपालिकाचे जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी यांनी कै.सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील याचा स्मारकासाठी नगरपालिका कार्यर्यालयासमोरील एकलव्य चौक येथील रिकामी जागा उपल्ब्ध करून देण्याची मागणी दिनांक ०१/०७/२०२६ रोजी च्या पत्राद्वारे केली आहे. शहादा नगरपालिकासमोरील जागा ही आदिवासी समाजाचे आराध्य दैवत तथा अस्मितेचे प्रतीक असणारे वीर एकलव्य यांच्या चौक व स्मारकासाठी निश्चित ठरलेली आहे हे माहीत असतानाही वीर एकलव्य यांच्या चौकाची ओळख पुसून काढण्यासाठी त्याच जागी दुस-या स्मारकाची मागणी करून या जातीयवादी नगरसेवकाने संपूर्ण आदिवासी समाजाला भडकावण्याचे मुद्दाम कट कारस्थान केले आहे.या जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी यांचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आपला शहादा तालुका सुद्धा आदिवासी बहुल आहे.तरी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत आदिवासी समाजाचे प्रतिक असणारे भगवान एकलव्य यांच्या नावाची ओळख म्हणून शहादा शहराच्या कोणत्याही चौकाला नामकरण करण्यात आलेले नाही,हे फार मोठे दुर्दैव आहे. दिनांक १ मार्च रोजी भगवान एकलव्य जयंती संपूर्ण भारतभर सह नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करतात. वीर एकलव्य हे श्रेष्ठ धनुर्धरी होते, परंतु वीर एकलव्य हे आदिवासी म्हणजेच भील समाजाचे , शुद्र जातीचे होते म्हणून गुरू द्रोणाचार्याने कपटनितीने वीर एकलव्यचा अंगठा गुरू दक्षिणेत कापून मागून मोठे कपट केले.आदिवासी समाजाचे आराध्य दैवत तथा अस्मितेचे प्रतीक, प्रेरणास्थान वीर एकलव्य यांची प्रेरणा व आदर्श आदिवासी बांधवांमध्ये रूजवण्यासाठी शहादा नगरपालिकासमोरील जागेवर वीर एकलव्य चौक व स्मारक बांधण्यात यावे, याबाबत शहादाचे भाजप आमदार राजेश पाडवी काय भुमिका मांडतात,ते बघून आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.


0 Comments