Advertisement

नंदुरबार पोलिसांच्या विरोधात सुशिलकुमार पावरा यांनी छेडले नाशिक येथे ५०८ वे उपोषण !


तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची SIT  मार्फत चौकशीची मागणी

नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सह पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दूरूपयोग करून मनमानी, असंवेधानीक, बेकायदेशीर रित्या आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सर्व सामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरोधातल्या मागण्यांसाठी सुशिलकुमार पावरा यांनी नाशिक येथे विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या समोर दिनांक १४ में २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून ५०८ वे लाक्षणिक उपोषण केले.नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने, भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणा-या भ्रष्ट, अकार्यक्षम, आदिवासी विरोधी, गुंड प्रवृत्तीच्या पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. ९ सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा व वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा.नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाणे नंदुरबारचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा.
                               आदिवासी पिडीत तक्रारदार व आदिवासी महिलांची तक्रार नाकारत तक्रारदारालाच शिवीगाळ करून मारहाण करून लाक अप मध्ये बंद करून ठेवणा-या, आरोपींना वाचवण्यासाठी तक्रारदाराची तक्रार नाकारत गैरवर्तन करणाऱ्या पोलिस निरीक्षक निलेश देसले यांना ४/४/२०२५ रोजीच्याचौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा.गेल्या ३ वर्षांपासून एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न देणाऱ्या व आदिवासींची सर्वच प्रकरणे दडपणा-या , अवैध्य धंद्यांना साथ देणा-या उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना सेवेतून निलंबित करा.करा. नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा मटका, जुगार, दारू, गुरखा, गांजा, असे अवैद्य व्यवसाय बंद करा.तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेणाऱ्या धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा.रात्री विना वर्दीत घरात घुसून चोरी करणाऱ्या ,दरोडा टाकणा-या शहादा पोलिस ठाण्यातील प्रविण सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक, युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दिपक चौधरी सह पोलिसांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व दरोडेखोर पोलिसांना सेवेतून बडतर्फ करा.
                          आदिवासी युवकांवरील खोटे व बनावट गुन्हे मागे घ्या, आदिवासींवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करणे बंद करा.जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्याकांड प्रकरणाची SIT  मार्फत चौकशी करा. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह संशयित पोलिस अधिकारी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची SIT मार्फत चौकशी करा. पोलिस कोठडीत सुशिलकुमार पावरा यांचा हत्येचा प्रयत्न व नंतर त्यांच्या वडिलांची हत्या करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून फाशी द्या.अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments