Advertisement

नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करा-आदिवासी संघटनांची मागणी


 
विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांना आदिवासी संघटनांचे निवेदन

नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, दत्ता पवार उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा,पोलिस निरीक्षक हेमंत पाटील गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व जिल्ह्यातील ६ तालुक्यातील पोलिस निरीक्षकांची बदली करा, अशी मागणी बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारत, आदिवासी युवा संघटना, आदिवासी युवा सेना इत्यादी संघटनांनी विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांच्या कडे दिनांक ५ में २०२६ रोजी निवेदन देऊन केली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी,राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारतचे महासचिव रोहीदास वळवी, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी,नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी,दिनेश वसावे ,मगन पावरा , दिलीप मुसळदे आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
                      निवेदनात म्हटले आहे की, वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारी वाढवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, दत्ता पवार उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा,पोलिस निरीक्षक हेमंत पाटील गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व ६ तालुक्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक यांनी चूकीचे व वाईट कामे केली. वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त (नंदुरबार ) सहकारी पोलिस अधिकाऱ्यांवर खालील गंभीर आरोप आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने , भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणे.जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला कट कारस्थान रचून दंगलीचे स्वरूप देणे.३०० पेक्षा अधिक निरपराध आदिवासी संघटना पदाधिकारी व आदिवासी बांधवांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री अटक करणे. पोलिस कोठडीत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे.सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्येमागे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांचा हात असल्याचा आरोप पोलिसांच्या विरोधात सोशल मिडियावर पोस्ट टाकणा-या तरूणांना बळजबरीने पोलिस ठाण्यात बोलावून धमकावणे, मोबाईल हिसकावून घेणे, मोबाईल जप्त करणे. बळजबरीने जप्त केलेले मोबाईल्स परत न देणे.पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणा-या पत्रकारांना धमकी देणे, दबाव तंत्र वापरणे.निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून गुन्हेगार ठरवून गुन्हेगारी वाढवणे.
             ‌‌ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या इशा-यावर , सुपारी घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करणे, पुढाऱ्यांच्या इशा-यावर निरपराध असंख्य लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून सर्व सामान्य माणसाची पिळवणूक करणे.सट्टा ,जुगार ,मटका,दारू,गुटखा,गांजा, हातभट्टी ,अवैध वाहतूक, अवैध लॉजमधील धंदे इत्यादी अवैध धंदे व व्यवसाय वाढवणे, अवैध धंद्याना संरक्षण देणे. जिल्ह्यातील सहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजकीय शिफारशींमुळे नेमले गेले असल्याचा आरोप आहे. या बदलीमुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.नंदुरबार शहर, नवापूर, शहादा, तळोदा, धडगांव आणि अक्कलकुवा या सहा पोलिस स्टेशनचे निरीक्षकांसह एलसीबीचे पोलिस निरीक्षक हे राजकीय दबावाखाली काम करतात. यामुळे गुन्हेगारांना पाठींबा मिळत असून, चोरी, गुन्हे, मर्डर आणि इतर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेने २०% ने वाढले असून यावर प्रभावी उपाययोजना अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments