विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापती यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन
शहादा प्रतिनिधी : नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.श्रवण दत्त हे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा सातत्याने दुरुपयोग करीत असल्याबद्दल व त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६१(२),१०९(१),१९० प्रमाणे फौजदारी गुन्हे व इतर गंभीर आरोप असल्या कारणास्तव पोलिस अधीक्षक श्रवण दत्त व इतर सह आरोपी ३ पोलिस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या कडे दिनांक २४/०३/२०२६ रोजी च्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जगदीश पावरा, पप्पू अवाया, दिलीप मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,श्री.श्रवण दत्त पोलिस अधीक्षक नंदुरबार हे आपल्या पदाचा,अधिकारांचा व कायद्याचा सतत दुरूपयोग करून आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरुद्ध भ्रष्ट पद्धतीने Contract Killer पद्धतीने बोगस व बनावटरित्या हद्दपारीची कार्यवाही करणे, खोट व बनावटरित्या गुन्हे दाखल करणे, रात्री बेरात्री घरात घुसून विना नोटीस,विना वारंट अटक करायला लावणे, पोलिसांना विना वर्दीत घरात घुसवून चोरी करायला लावणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठविणा-यांचा आवाज दाबणे, अवैध धंदे व अवैध व्यवसाय विरोधात निवेदन देणा-यांना टार्गेट करणे, पोलिस कोठडीत जाती वाचक व अश्लील वाईट शिविगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, हत्येचा कट रचणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे, इत्यादी अनेक प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांनात्रास देत आहेत . श्री श्रवण दत्त यांच्या या बोगस व मनमानी कारभाराविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक आदिवासी सामाजिक महिलांनी जिल्हाधिकारी श्रीमती मित्ताली सेठी यांना दिनांक २८ /०२/२०२६ रोजी निवेदन दिले नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाणे नंदुरबारचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक ,अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ६१(२) अन्वये हत्येचा कट रचला,कलम १०९(१) अन्वये हत्येचा प्रयत्न ,जीव घेण्याचा प्रयत्न, खून करण्याचा प्रयत्न, कलम १९० अन्वये एकापेक्षा अधिक जणांनी म्हणजेच पोलिस अधिकाऱ्यांनी जमाव मिळून हत्येचा कट रचला व हत्येचा प्रयत्न केला, म्हणून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. सदर गुन्ह्याची नोंद कु.अ.नहार मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयात दिनांक ३०/०९/२०२५ रोजी करण्यात आली आहे.
जय वळवी या आदिवासी तरूणाचा पोलिसांच्या देखत नंदुरबार येथे खुलेआम चाकूने खून करण्यात आला.त्याविरोधात आदिवासी समाजाने दिनांक २४/०९/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेल्या मूक मोर्चाला षडयंत्र पूर्वक दंगलीचे स्वरूप देऊन अनेक निरपराध लोकांवर सुबुद्धीने पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला लावले. पोलिस कोठडीत असतांना अमानुषपणे मारहाण केली.
पोलिस अधीक्षक श्रवण एस दत्त हे नंदुरबार जिल्ह्यात आल्यापासून सर्रासपणे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून लोकाभीमूख प्रशासनाला घातक आहेत, भ्रष्ट पद्धतीने काम करत आहेत, आदिवासी समाजाला तुच्छ लेखणारे असून आदिवासी समाज विरोधात जाणीवपूर्वक कार्यवाही करणारे आहेत . भूमाफियांच्या विरोधात गुन्हे दाखल करीत नाही,भ्रष्ट,अकार्यक्षम, आदिवासी विरोधी, राजकीय Contact killer,पदाचा, कायद्याचा व अधिकाराचा दुरूपयोग करणारे ,न्यायापेक्षा अन्यायाला संरक्षण देणारे , आपल्या कार्यकाळात आर्थिक लाभ व्हावा म्हणून अवैध धंदे सुरू करणारे आहेत, त्यांच्या मिळकतीची चौकशी करण्यात यावी .
पोलिस अधीक्षक श्री .श्रवण दत्त हे चूकीचे काम करत असून राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व दबावाखाली, सुबुद्धीने सामाजिक कार्यकर्त्यांना नोटीस बजावत आहेत, राजकीय पुढाऱ्यांशी हितसंबंध, आर्थिक घडामोडी, राजकीय पुढाऱ्यांचे वरदहस्त असल्याने श्री. श्रवण दत्त पोलिस अधीक्षक नंदुरबार हे चूकीच्या पद्धतीने हद्दपारीची नोटीस पाठवून सामाजिक कार्यकर्त्यांना हेतूपुरस्सर त्रास देत आहेत,सामाजिक कार्यकर्त्यांविरूद्ध अवैध, बेकायदेशीर, बोगस व बनावटरित्या हद्दपारी प्रस्तावावर कार्यवाही करत आहेत.सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपार केल्यास आदिवासींच्या विषयांवर कोण बोलणार ?आम्हाला कोण साथ देणार ?असा सवाल उपस्थित होतो.राजकीय पुढारी हे श्री .श्रवण दत्त पोलिस अधीक्षक यांना हाताशी धरून हे सगळे राजकीय सुडापोटी करत आहेत,आदिवासींचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.जिल्ह्यातील पोलिस रात्री बेरात्री विना वर्दीत घरात घुसून आदिवासी महिला, मुलांना व पुरूषांना त्रास देतात, खोटे व बनावट गुन्हे दाखल करून आदिवासी बांधवांना अटक करतात.हे पोलिस आहेत की गुंडा?असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अशांतता पसरत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस आदिवासींवर जबरदस्तीने अन्याय अत्याचार करत आहेत.म्हणून नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्री .श्रवण दत्त यांच्या वर बडतर्फीची कारवाई करावी ,नंदुरबार जिल्ह्यातून तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments