भारतीय न्याय संहितेचे कलम ६१(२),१०९(१),१९० अन्वये गुन्हा; न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष!
नंदुरबार प्रतिनिधी: नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाणे नंदुरबारचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक ,अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ६१(२) अन्वये हत्येचा कट रचला,कलम १०९(१) अन्वये हत्येचा प्रयत्न ,जीव घेण्याचा प्रयत्न, खून करण्याचा प्रयत्न, कलम १९० अन्वये एकापेक्षा अधिक जणांनी म्हणजेच पोलिस अधिकाऱ्यांनी जमाव मिळून हत्येचा कट रचला व हत्येचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर ५८३/२०२५ नूसार नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद कु.अ.नहार मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयात दिनांक ३०/०९/२०२५ रोजी करण्यात आली आहे.भारतीय न्याय संहितेचे कलम ६१(२) अन्वये हत्येचा कट रचणे, कलम १०९(१) अन्वये हत्येचा प्रयत्न करणे,कलम १९० अन्वये एकापेक्षा अधिक जमावाने कट रचून हत्येचा प्रयत्न करणे गुन्हा घडल्यास, फिर्यादीस इजा झाली असल्यास आरोपींना मृत्यूदंड, जन्म ठेपेची शिक्षा किंवा दोन वर्षे किंवा त्याहून अधिक सक्त मजूरीची शिक्षा होऊ शकते.
तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की,दिनांक २४/०९/२०२५ रोजी रात्री ००.३० वाजता आम्ही झोपलेले असताना घरात घुसून पोलिसांनी जबरदस्तीने मला अटक करून बॅडमिंटन हॉल पोलिस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे आणले.तेथे बोसडीके ,चीफ अशी अश्लील व वाईट शिवीगाळ करून पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला १४२ आरोपींसमोर मारण्यासाठी हात उगारला, मारण्याचा प्रयत्न केला.मैं आयोजकोंकी एकेक की क्लास लूंगा,इसकी वजह से तुम सब अटके हुए हो,असे सांगून भडकावण्याचे काम केले.याला वेगळं ठेवा व शहर पोलिस ठाणे नंदुरबार येथे मारायला घेऊन जा.असे सांगितले.दिनांक २६/०९/२०२५ रोजी रात्री ९.३० वाजता गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार येथे मला व इतर ३ जणांना आणण्यात आले.तेथे वाईट व अश्लील शिवीगाळ करून पोलिसांच्या विरोधात विडीओ बनवतो का,असे बोलून अप्पर पोलीस अधिक्षक आशित कांबळे यांनी मारहाण करायला सुरुवात केली.पोलिसांना जजपेक्षा जास्त पॉवर असतो,एकाने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली होती,त्याला मी तडीपार करून टाकले होते,तुलाही तडीपार करून टाकीन, यापुढे तक्रार केली तर याद राख, मारून टाकीन अशी धमकी दिली.तुझ्या आईवर चढायला आलो होतो का? म्हणून पोलिसांच्या विरोधात विडीओ बनवतो,अशी वाईट व अश्लील शिवीगाळ करून तुझी वाट बघत होतो,तू कोठे अडकतो, असे म्हणत हेमंत पाटील पोलिस निरीक्षक यांनी दोन्ही गालांवर मारत होते.मारहाण ठिकाणी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, हेमंत पाटील व हेमंतकुमार पाटील हे उपस्थित होते.मारहाण करून मला मेडिकलला घेऊन गेले नाहीत.दिनांक २९/०९/२०२५ रोजी माननीय न्यायाधिशांसमोर माझी तक्रार मी सांगून दाखवली.मला सरकारी रूग्णालय नंदुरबार येथे ८ तास उपचार करण्यात आले व दिनांक ३०/०९/२०२५ रोजी माननीय न्यायाधिशांसमोर लेखी तक्रार नोंद करण्यात आली व तुम्हाला मारहाण केल्याचे डॉक्टरच्या रिपोर्ट मध्ये लिहिले आहे.त्यानूसार आम्ही संबंधित पोलिसांवर कारवाई करू असे न्यायाधिशांनी सुशिलकुमार पावरा यांना सांगितले.
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला.माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली,त्या हत्येमागे याच पोलिस अधिकाऱ्यांचा हात आहे.आपल्या पदाचा,वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून माझ्या सारख्या अनेक निरपराध व्यक्तींवर यांनी अत्याचार केला आहे.माझे मारहाणीचे प्रकरण दडपण्यासाठी यांनी मला पुन्हा जबरदस्तीने रात्री घरातून अटक करायला लावली,खोटा व बनावट गुन्हा बनवला. डॉक्टराला पैसे देऊन, मॅनेज करून मारहाणीचा मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी श्रवण दत्त यांनी भ्रष्ट काम केले. भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांचे नाव घेऊन मला मारहाण करण्यात आली.अशा भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळेच भारतात भ्रष्टाचार व गुन्हेगारी वाढत चालली आहे.अशा भ्रष्ट पोलिसांमुळे लोकांचा पोलिसांवर विश्वास राहिला नाही.म्हणून यांना पदावरून बडतर्फ केले पाहिजे व अटक करून जेलमध्ये टाकले पाहिजे,मला न्याय मिळेल,असा न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे,अशी प्रतिक्रिया तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.


0 Comments