परप्रांतीय लोकांची गुंडागिरी व दादागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत - सुशिलकुमार पावरा
शहादा प्रतिनिधी :नंदुरबार येथे दिनांक १६ मार्च २०२६ रोजी आदिवासी तरुण मनोज साबळे, अक्षय कोकणी व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणा- या घटनेतील मुख्य आरोपी प्रफुल राजेश रघुवंशी,पराग राजेश रघुवंशी , सूर्यकांत खंडू माळी,उमेश माळी (पाणीपुरी वाला ),जीवन माळी ,जयेश माळी ,शुभम गायकवाड सह इतर १० ते १५ संशयित आरोपींवर प्राणघातक हल्ला व ॲस्ट्रासिटीसह इतर गुन्हे दाखल करून संबंधित घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेली परप्रांतीय लोकांची दादागिरी व गुंडागिरी आम्ही खपवून घेणार नाहीत,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
संघटनेला मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरात असलेले हॉटेल एम एच ३९ खान्देश जंक्शन दि. १६-३-२०२६ वार सोमवारी रात्री १०.३० चा सुमारास हॉटेल मालक अक्षय कोकणी (अक्की) व त्याचे वडील आणि चुलत भाऊ मनोज साबळे हे हॉटेल ला त्यांचं काम करत असताना पराग राजेश रघुवंशी व नयन बनकर हे बाहेरून दारू पिऊन हॉटेल ला येऊन आम्हाला ५ मिनिटात जेवण द्या ,म्हणून जातीवाचक शिवीगाळ करतात . हॉटेल मध्ये फॅमिली बसल्या कारण मुळे तुम्ही शिवीगाळ करू नका ,एवढं बोलण्याचा कारणा चा राग येऊन पराग रघुवंशी याने सूर्यकांत खंडू माळी व प्रफुल राजेश रघुवंशी ला फोन केला व आम्हाला जेवण देत , म्हणून तुम्ही हॉटेल ला १५ ते २० मुलं घेऊन यां सांगितले. त्या नंतर थोड्याच वेळात सूर्यकांत माळी, उमेश माळी(पाणीपुरीवाला), जीवन माळी,जयेश माळी,बापू गुरव, प्रफुल रघुवंशी व त्यांचे इतर साथीदार हे हॉटेल ला येऊन “तुम्ही आदिवासी मातून गेले का, तुमची औकात आहे का हॉटेल चालवायची ,तुम्ही झोपडीत राहणारे लोक आमची बरोबरी करणार का, असच कोकणटे भिलटे लोक” तुम्ही अश्या प्रकारे जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा सोबत घेऊन आलेल्या लोखंडी रॉड,फाईटर,लाकडी दांड्या,चोपर ने हल्ला केला व मोठ्या प्रमाणात हॉटेल मध्ये तोडफोड करत मारहाण केली. सदर घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स़ संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.
सदर प्राण घातक हल्ल्यात आदिवासी तरुण मनोज साबळे यास डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे.आदिवासी समाजावर नेहमी अश्या प्रकारचे हल्ले होत असता अशाच प्रकारे जयबाबा वळवी यांचा वर हल्ला झाल्या मुळे त्यांचा जीव गेला.नंदूरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून आमचा परिसर आमचा गाव तरी नेहमी आदिवासी लोकांवर अशा प्रकारचे अत्याचार वारंवार होत आहेत.ही अत्यंत खेदाची बाब आहे. हे आरोपी गुन्हा करूनही गावात मोकाट फिरत असून त्यांना कोणत्याच प्रकारची कायद्याची भीती नाही.या घटनेतील आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला, ॲस्ट्रासिटी सह इतर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments