धडगांव प्रतिनिधी : धडगांव तालुक्यातील चुलवड ते तलाई १५ किलोमीटरचा रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करुन रस्ता दुरुस्ती करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार अक्राणी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या कडे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात होती. या रस्त्याच्या कामासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून याच रस्त्यावर २ वर्षांपूर्वी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते व त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. अखेर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून
धडगांव तालुक्यातील धडगाव ते नंदुरबार जिल्ह्याचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी व धडगांव अक्कलकुवाचे ३५ वर्ष माजी आमदार के सी पाडवी यांच्या असली या गावाकडे जाणारा रस्त्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेने वेळोवेळी प्रशासनास निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी रेटून धरण्यात आली होती. आमदार , खासदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे जनतेचे स्वप्न अपुरेच राहीले होते.या मार्गावरील चुलवड ते तलाई या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला होता. याच रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसेस ये जा करतात.रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
या रस्त्याचे बारा वाजले होते.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था होती.रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला होता.रस्त्यावर खोल खड्डे झाले होते. या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले होते. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होऊन दुखापत होत होती. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून चूलवड ते तलाई पर्यंतचा १५ किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स़ संघटनेकडून देण्यात आला होता.


0 Comments