Advertisement

धडगांव नगरपंचायतचा कारभार नंदुरबारहून चंदूभैया चालवतात - सुशिलकुमार पावरा


धडगांव नगरपंचायतीच्या करवाढीविरोधात बिरसा फायटर्सचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 नंदुरबार प्रतिनिधी : धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु या नगरपंचायतीने केलेल्या अन्यायकारक मालमत्ता करवाढीला स्थगिती मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे केलेली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जगदीश पावरा, पप्पू अवाया आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                       धडगांव  नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता धारक (नागरिक) त्रस्त झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुका हा अतिदुर्गम तालुका असुन पेसा अंतर्गत येतो. येथे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातुन हजारो मजुर मजुरीसाठी परराज्यात, परप्रांतात स्थलांतर होतात. हे या तालुक्याचे मोठे दुर्देव आहे. गावात लोक नसल्याने गावची गावे ही औंस पडुन आहे. व्यापार मंदावतो. लोक नसल्याने दैनंदिन व्यवहारावर फारच परिणाम होतो. एकंदरीत अशी परिस्थिती तालुक्याची सद्यस्थितीत आहे. त्यातल्या-त्यात अशी मंदीची परिस्थिती असतांना येथील धडगांव-वडफळ्या रोषमाळ बुद्रुक या नगरपंचायतीने मालमत्ता करांमध्ये भरमसाठ करवाढ केल्याने मालमत्ता धारकांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटतांना दिसुन येत आहे.
                         मालमत्ता करांमध्ये चारपट ते सहापट रकमेची वाढ करुन मालमत्ता करवाढ केली आहे. नागरिकांचे या अन्यायकारक करवाढीमुळे कंबरडे मोडले जात आहे. नगर पंचायतीकडे मालमत्ता धारकांची संपूर्ण यादी व सन २०२४-२०२५  मध्ये नगर पंचायतीकडुन वसुल करण्यात आलेली घरपट्टी व नळ पट्टी यादी तसेच २०२५-२०२६ या वर्षात वसुल करण्यात येत असलेली कराची यादी मागितली असता नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
                           याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीतील मालमत्ता करवाढ करायचीच होती तर १०%ते १५ % पर्यंत करवाढ केली असती तर यात काहीच हरकत नव्हती. परंतु त्यांनी कोणत्या निकषाद्वारे सरदची मालमत्ता करवाढ केली. त्याचे समाधान कारक उत्तरे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना देता येते नाही. याउलट त्यांनी पुर्वीच्या घरपट्टी व नळपट्टीत चारपट ते सहापट वाढ करुन मालमत्ता धारकांना एकप्रकारे धक्का दिला आहे. जिल्ह्यात नंदुरबार, शहादा या शहरांत देखील येथील करवाढीपेक्षा कमी स्वरुपात कर आकारणी केली आहे. परंतु येथील नगरपंचायतीने नंदुरबार, शहादा सारख्या शहरांना मागे टाकत अन्यायकारक करवाढी केलेली आहे. तसेच यात शिक्षण कर हा जास्त प्रमाणात आकारला जात आहे. त्यातल्या त्यात येथे एकही नगरपंचायतीची शाळा नाही. तरी देखील भरमसाठपणे शिक्षण कर आकारला जात आहे. तरी या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी त्यावर योग्य न्याय द्यावा व मनमानी करवाढीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
                       धडगांव नगरपंचायतच्या करवाढीबद्दल नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी बोलायला  पाहिजे,ते का घाबरतात ?या करवाढीबद्दल आमदार चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदूभैया हे नंदुरबारहून बोलतात.याचाच अर्थ नंदुरबारहून धडगाव नगरपंचायतचा कारभार चंदूभैया चालवतात.नगराध्यक्ष व नगरसेवकांना बोलायचाही अधिकार त्यांनी ठेवला नाही.हे फार मोठे दुर्दैव आहे.ही एक प्रकारची हूकुमशाही व मनमानी सुरू आहे.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments