Advertisement

४० वर्षांनंतर तरी खासदार व माजी आमदारांच्या गांवाकडे जाणारा रस्ता बनेल का? जनतेचे स्वप्न अपुरेच!


चुलवड ते तलाई रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

धडगांव प्रतिनिधी : धडगांव तालुक्यातील चुलवड ते तलाई १५ किलोमीटरचा रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करुन रस्ता दुरुस्ती करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार अक्राणी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, विभागीय अध्यक्ष विजय पावरा, धडगाव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी, सचिव मुकेश पावरा,दिलवर पाडवी, उदेसिंग पराडके,सुरेश पवार, रामदास मुसळदे, दिलीप मुसळदे ,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                     धडगांव तालुक्यातील धडगाव ते नंदुरबार जिल्ह्याचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी व धडगांव अक्कलकुवाचे ३५ वर्ष माजी आमदार के सी पाडवी यांच्या असली या गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा, म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून या रस्त्यावर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते व सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.वेळोवेळी प्रशासन निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी रेटून धरण्यात आली होती. आमदार , खासदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे जनतेचे स्वप्न अपुरेच राहीले आहे.या मार्गावरील चुलवड ते तलाई या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा  रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे. याच रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसेस ये जा करतात.रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
         या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था  आहे.रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.रस्त्यावर खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून चूलवड  ते तलाई पर्यंतचा १५ किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स़ संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments