Advertisement

आदिवासींना हलक्यात घेवू नका, आमच्या जातवर उतरायला आम्हाला वेळ लागणार नाही - आदिवासी बांधवांचा पोलिसांना इशारा

आदिवासींनी आपल्या मुलांना शाळा शिकवून उपयोग नाही, गुंड बनवावे लागेल- आदिवासी बांधवांची संतप्त प्रतिक्रिया

शहादा प्रतिनिधी : आदिवासी समाजाला आमचे आवाहन आहे की,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलीस विना नोटीस,विना वारंट, काही कारण नसताना केव्हाही रात्री बेरात्री त्यांच्या घरात घुसून जबरदस्ती उचलून घेऊन जातात. सुशिलकुमार पावरा हे आदिवासी समाजाच्या लोकांना अडी अडचणीला नेहमीच साथ देत असतात.ग्रामपंचायतचा विषय असो की जिल्हा परिषद, नगरपालिका, बांधकाम विभागाचा विषय असो,ते भ्रष्टाचार विरोधात काम करतात.वारंवार भ्रष्टाचार होतो,त्याला रोखणे गुन्हा आहे का? भ्रष्टाचारविरोधात कामं करतात म्हणून सुशिलकुमार पावरा यांना पोलीस वारंवार उचलून घेऊन जातात.आदिवासींवर जिकडे तिकडे अन्याय सुरू आहे, त्यामुळे आदिवासींच्या विषयावर बोलणारे सुशिलकुमार पावरा हेच आमचे वाली आहेत. आज बिरसा मुंडांच्या जागी सुशिलकुमार पावरा आहेत.ते आधुनिक बिरसा आहेत.आदिवासी समाजासाठी लढत आहेत.अशा सुशिक्षित माणसाला पोलिस विनाकारण वाऱंवार उचलून नेत असतील तर आम्ही आमच्या मुलांना शिकवायचे की गुंड बनवायचे? संविधान मार्गाने लढणा-यालाही वारंवार पोलिस त्रास देत असतील तर आमच्या मुलांना शिक्षण देऊन काय अर्थ आहे. आदिवासींनी आता आपल्या पोरांना शाळा शिकविण्याची गरज नाही, आपल्या पोरांना गुंड बनवायला पाहिजे.तेव्हा सरकार आदिवासींना घाबरेल, आदिवासींना काहीच किंमत देत नाही.आदिवासींना हलक्यात घेत आहेत. आम्ही चांगल्याला चांगले व वाईटला वाईट आहोत. पोलिसांनी चांगली कामे केल्यावर आम्ही त्यांना फुलहार घालू, चुकीचे काम कराल तर आम्हाला आमच्या आदिवासी जातवर यायला वेळ लागणार नाही,असा इशारा शहादा येथील आदिवासी बांधवांनी पोलिसांना दिला आहे.
                ४-५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार होत आहेत, त्याविरोधात बोलू नये का? सुशिलकुमार पावरा हे अन्याय अत्याचार विरोधात बोलतात म्हणून त्यांना केव्हाही पोलिस घरातून उचलून नेतात.कोणता गुन्हा नाय,काय नाय, विनाकारण उचलून नेतात! जय वळवीची हत्या झाली, त्याविरोधात सुशिलकुमार पावरा बोलले म्हणून पोलीसांनी त्यांना रात्री अटक करून जेलमध्ये टाकले. त्या प्रकरणात पोलिसांनी आदिवासींना काय न्याय दिला? पोलिस अशे गरीब लोकांवर अन्याय अत्याचार करत असतील तर आम्ही कोणावर विश्वास ठेवावा, आम्हाला न्याय कोण देणार? आदिवासीं लोकांवर कायम अन्याय होत आहे, सुशिलकुमार पावरा आदिवासी लोकांना न्याय मिळावा, म्हणून काम करतात,त्यांनाच पोलीस रात्री उचलून घेऊन जातात.
                    शहादा पोलिस ठाण्यातील पोलीस आदिवासींवर नेहमीच अन्याय करतात. आदिवासींच्या तक्रारी दाबून टाकतात. आदिवासींना कधीच न्याय देत नाहीत.याविरोधात आपल्याला काहीतरी उठाव करावा लागेल,असा आंदोलनाचा इशारा शहादा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments