Advertisement

पोलिसांच्या विरोधात आदिवासींचा आक्रोश; विना वर्दीत विना नोटीस आदिवासींच्या घरात रात्री घुसून अटक करत असल्याचा आरोप!

शहादा प्रतिनिधी:शहादानं ऐ पोलिस शे की गुंडा ?बिना वरादीमां राती घरात घुसता,तुमी गुंडा की पोलिस शे, आमी कसं ओळखू,बिगर गुनान घरातनं उचलीन ली जातस् आय काय चालू शे?कवयभी सुशिलकुमार पावरा ला उचलीन ली जातस् राती ११,१२ वाजता कवयभी येतंस,९ फेब्रुवारी ला शहादा मा पोलिस विरोधामा मोर्चा से बठा येवाना,आमू भी यी रायना ,यो आदिवासी पर अत्याचार बंद करा,अशा आदिवासी भिलोरी भाषेत आदिवासी बांधवांनी शहादा पोलिसांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ९.३० वाजे दरम्यान सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात प्रभूदत्तनगर ता. शहादा जिल्हा नंदूरबार येथे कोणतेही कारण, समन्स, वारन्ट न देता श्री. प्रविण सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. युवराज पाटील, श्री. घनश्याम सूर्यवंशी, श्री दिपक चौधरी व इतर पोलिस यांनी तोंडाला रुमाल, मास्क बांधून विना पोलिस वर्दीत घुसून, हातातील सॅमसंग कंपनीचा ९६६५००६४६३ हा नंबर चालू असलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत धक्का बुक्की करून अवैध रित्या अटक करून पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलिस कस्टडीत टाकले.दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात अचानकपणे पोलिसांनी विना वर्दीत (पोलिस की डाकू या वेशात) घुसून घरातील सॅमसंग ए ७० नावाचा ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एच पी चा गॅस सिलिंडर, घरातील ५०१५ रोख रक्कम व सुटकेस मधील काही महत्वाची कागदपत्रे, प्लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरी करून रात्री दरोडा टाकल्याबद्दल संबंधित पोलिसांवर दरोडाचा, चोरी, अस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा.
                 सुशिलकुमार पावरा हे आदिवासी समाजासाठी दिवस रात्र काम करत आहे.त्यांना पोलिस हे पुढा-यांच्या इशा-यावर विना नोटीस, विना वर्दीत रात्री बेरात्री येऊन जबरदस्ती अटक करून जेलमध्ये टाकत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीर जिल्हा हद्दपार नोटीस पोलिस पाठवत आहेत.पोलीस दिवसा न येता रात्री चोरासारखे घरात का घुसतात? असा सवाल उपस्थित करत सुशिलकुमार पावरा व आदिवासी कार्यकर्त्यांना त्रास देणे बंद करा.आदिवासी समाजाला कमी लेखू नका.आदिवासी समाज एकजूट होऊन संविधानिक मार्गाने पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल.असा इशारा आदिवासी बांधवांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments