शहादा प्रतिनिधी :- पोलिसांचा दिवसेंदिवस आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात, आदिवासी लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री अटक करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात,आदिवासी गरीब लोकांच्या रस्त्यावर गाड्या अडवून लुटमार करणाऱ्या, त्रास देणाऱ्या पोलिसांविरोधात,पोलिस हे जनतेचे रक्षक नसून भक्षक झालेत,पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक ते उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा पर्यंत आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे उलगुलान महा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले आहे.
दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ९.३० वाजे दरम्यान सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात प्रभूदत्तनगर ता. शहादा जिल्हा नंदूरबार येथे कोणतेही कारण, समन्स, वारन्ट न देता श्री. प्रविण सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. युवराज पाटील, श्री. घनश्याम सूर्यवंशी, श्री दिपक चौधरी व इतर पोलिस यांनी तोंडाला रुमाल, मास्क बांधून विना पोलिस वर्दीत घुसून, हातातील सॅमसंग कंपनीचा ९६६५००६४६३ हा नंबर चालू असलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत धक्का बुक्की करून अवैध रित्या अटक करून पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलिस कस्टडीत टाकले.दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात अचानकपणे पोलिसांनी विना वर्दीत (पोलिस की डाकू या वेशात) घुसून घरातील सॅमसंग ए ७० नावाचा ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एच पी चा गॅस सिलिंडर, घरातील ५०१५ रोख रक्कम व सुटकेस मधील काही महत्वाची कागदपत्रे, प्लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरी करून रात्री दरोडा टाकल्याबद्दल संबंधित पोलिसांवर दरोडाचा, चोरी, अस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा.समाजसेवक तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुष पणे मारहाण करणा-या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदूरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर अस्ट्रासिटी, अमानुष पणे मारहाण, जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदांचा दुरूपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा.
वादग्रस्त, पोलिस कस्टडीत मारहाण प्रकरणात आरोपीत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा. सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा श्री. दत्ता पवार यांनी पाठवलेली जिल्हा हद्दपार नोटीस रद्द करुन मागे घ्या. पिंपर्ळे येथील कृष्णा वाघ या आदिवासी फिर्यादीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करीत धमकी व दमदाटी करून जबर मारहाण करून गंभीर दुखापत झाली आहे,त्या आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये बंद करणे, डांबून ठेवणा-या पोलिस निरीक्षक निलेश देसले यांना निलंबित करा.मागील ३ वर्षांपासून एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न देणाऱ्या श्री. दत्ता पवार उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा यांना पदावरून हटवा.जय वळवी या आदिवासी युवकाची नंदुरबार शहरात पोलिसांच्या देखत चाकूने हत्याकांड प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी.आदिवासी गरीब लोकांच्या गाड्या अडवून लुटमार करणाऱ्या, त्रास देणाऱ्या ट्राफीक पोलिसांवर कारवाई करा. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.


0 Comments