Advertisement

सुशिलकुमार पावरा यांच्या घरात दरोडा; पोलीस की डाकू? ग्रामस्थांचा सवाल


मोबाईल, पैसे, कागदपत्रे, गाडीची चावी चोरीची शहादा पोलिस ठाण्यात तक्रार

शहादा प्रतिनिधी : सॅमसंग ए ७०  मोबाईल, गॅस सिलिंडर, पैसे, कागदपत्रे,प्लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तू घरातून चोरी झाल्याबद्दल गुन्हा दाखल  करून कायदेशीर कारवाई करा, अशी तक्रार सुशिलकुमार पावरा यांनी शहादा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.                 तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की , दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ९ .३० वाजे दरम्यान माझ्या राहत्या घरात प्रभूदत्तनगर तालुका शहादा जिल्हा नंदूरबार येथे कोणतेही कारण,समन्स ,वारन्ट न देता श्री. प्रविण सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक श्री युवराज पाटील, श्री घनश्याम चौधरी, श्री दिपक चौधरी हे  अचानक पणे विना वर्दीत पोलिस की डाकू या वेशात घुसले व माझ्या हातातील सॅमसंग कंपनीचा ९६६५००६४६३ हा नंबर चालू असलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत मला धक्का बुक्की करून अवैध रित्या अटक करून पोलीस गाडीत बसवले व पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलिस कस्टडीत टाकले. 
                     दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी  माझ्या राहत्या घरात अचानक पोलिस घुसल्यानंतर माझ्या घरात असलेला सॅमसंग ए ७० नावाचा ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल,एच पी चा गॅस सिलिंडर, माझ्या घरातील ५०१५ रोख रक्कम व सुटकेस मधील काही महत्वाची कागदपत्रे,प्लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरीला गेले आहेत.तरी माझ्या राहत्या घरात चोरी गेलेल्या वस्तूंची सखोल चौकशी करून चोरी करणाऱ्यांवर दरोडाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.रात्री बेरात्री पोलिस विना वर्दीत कोणाच्याही घरात घुसून महिला, मुलांना त्रास देत आहेत,घरातून रात्री घेऊन गेलेल्या व्यक्तीला रस्त्यावर मारून फेकल्यावर आम्ही कोणाला जबाबदार धरावे? आमच्या घरात  पोलिस दिवसा न येता रात्री बेरात्री कोणत्या उद्देशाने येतात, रात्री घरात घुसलेले पोलिस होते की डाकू,चोर होते हे आम्ही कसे ओळखावे ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments