शहादा प्रतिनिधी: शहादा तालुक्यातील म्हसावद ते राणीपूर रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्त करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा जि.नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.निवेदनाचा प्रशासनावर परिणाम होऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरवात झाली आहे.सर्वसामान्यांचा आवाज कोणीतरी उठवत आहे, असे म्हणत वाहनधारक व प्रवाशी बिरसा फायटर्सच्या कार्यावर समाधान व्यक्त करीत आहेत. निवेदनात म्हटले होते की,शहादा तालुक्यातील म्हसावद ते राणीपूर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे.
सदर रस्ता हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांक चे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे जाणारा एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते.या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस ये जा करतात. ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था आहे.रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.रस्त्यावर खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्त करण्यात यावा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला होता.


0 Comments