Advertisement

शहादा तालुक्यातील प्रलंबित २८ वनदावे निकाली काढा:- बिरसा फायटर्स


लाभार्थी अनेक योजना पासुन वंचित वनदावे निकाली न झाल्यास बिरसा फायटर्सचा आंदोलन

शहादा प्रतिनिधी:-शहादा तालुक्यातील शहाणा, कन्साई, वडगांव व नागझिरी येथील प्रलंबित २८ वनदाव्यांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून निकाली काढणेबाबत..या मागणीचे निवेदन मा जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिले आहे, यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू अवाया,आदि कार्यकर्ते उपस्थित होते 
निवेदनात म्हटले आहे की मा. उपविभागीय अधिकारी शहादा यांनी मा. सहा. वनसंरक्षक शहादा यांना दिनांक २१/०२/२०२४ रोजी दिलेल्या पत्रानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधि. २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ ची अंमलबजावणी.. मूळ वनदाव्यांची तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरी होवून मिळणेबाबत चे पत्र पाठवले आहे. शहादा तालुक्यातील एकूण २८ वनदाव्यांबाबत अभिप्राय मागितला होता. परंतू १ वर्षांहूनही अधिक कालावधी होवूनही सदर वनदाव्यांबाबत अद्याप अभिप्राय आले किंवा नाही, कसे ते समजले नाही. त्यामुळे वनदावेदार पंतप्रधान पिक विमा योजना अशा विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत. मा.उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या कार्यालयात एकूण २८ वनदावे दाखल आहेत,म्हणून शहादा तालुक्यातील शहाणा, कन्साई, वडगांव, नागझिरी येथील प्रलंबित २८ वनदाव्यांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून वनदावे निकाली काढण्यात यावेत हीच नम्र विनंती मा जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments