वनपट्टे प्रमाणपत्र न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन छेडण्यात येईल:- बिरसा फायटर्स
शहादा प्रतिनिधी:-मा.अध्यक्ष,जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी शहादा तालुक्यातील येथील वनपट्टे प्रमाणपत्र वनदावेदारांना तात्काळ मिळणेबाबत. अन्यथा बिरसा फायटर्स मार्फत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे, यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राजय उपाध्यक्ष गणेश खर्डे आदि कार्यकर्ते उपस्थित होते,निवेदनात म्हटले आहे की मा.अध्यक्ष,जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखालील दिनांकः ३१/१२/२०२४ रोजी बैठकीत नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील,शहाणा,वडगाव,लंगडी,सटिपाणी,मलगाव,चांदसैली,नवानगर,भोंगरा,भुलाणे, इत्यादी गावातील एकूण १०५३ चा लगबग वनदाव्यांवर सुनावणी झाली आहे,
हो एकूण ३६८ वनदावे मंजूर करण्यात आले होते. त्या मंजूर वनदाव्याचे वनपट्टे वनदावेदारांना देण्यात आलेले नाहीत. यापूर्वीही मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या दिनांक ३१/०५/२०२४ रोजीच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एकुण २१ मंजूर करण्यात आलेले वनदाव्यांचे श्री. हर्षल सोनार, जिल्हा समन्वयक वनविभाग नंदुरबार यांच्या हलगर्जीपणामुळे देण्यात नाही आले.त्यामुळे वनदावेदारांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागते आहे,शहादा तालुक्यातील अनेक गावांचे वनदावेदारांचे मंजूर करण्यात आलेल्या वनदाव्यांचे वनपट्टे प्रमाणपत्र तात्काळ मिळावेत अशी नम्र विनंती.वनदावेदार यांना वनपट्टे न मिळाल्यास बिरसा फायटर्स मार्फत आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा बिरसा फायटर्सनी जिल्हाधिकारी यांना दिले
0 Comments