बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे यांच्या नावाची चर्चा
शहादा: आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत बिरसा फायटर्सची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेची दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली.या सभेत बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, नाशिक विभागीय किशोर ठाकरे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष धनुआयुष भंडारी, नंदुरबार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, नंदुरबार उपाध्यक्ष करण सुळे, सुरेश पवार, एकनाथ ठाकरे, दिलिप मुसांडे, सोमनाथ सुळे, शिरपूर बिरसा फायटर्स टिम, मध्यप्रदेश बिरसा फायटर्स टीम आदी बिरसा फायटर्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत चांदसैली गटातून बिरसा फायटर्सचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.त्याचा मला आनंद आहे.बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्रात ३८० पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद आहेत. २६ लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.संघटनेत शिक्षक,डाॅक्टर, वकील,आर्मी,पहिलवान, गायक, नृत्यक, संगितकार, लेखक, कवी,पत्रकार,शेतकरी,मजूर, विद्यार्थी,महिला तसेच आमदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचाही समावेश आहे.
बिरसा फायटर्स संघटनेची स्वतंत्र अशी आदिवासी विचारधारा आहे.आदिवासींच्या एकूणच विषयावर संघटना काम करते आहे.चोपडाचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्या अवैध जात प्रमाणपत्रावरून त्यांना पदावरून हटवा,यासाठी बिरसा फायटर्सने याचिका दाखल केलेली आहे,बोगस आदिवासी,इतर जातींचा आदिवासींमध्ये आरक्षणाचा समावेश,पेसा भरती व शासनाच्या चूकीच्या धोरणांविरोधात काम करताना बिरसा फायटर्सचे संघटना नेहमीच आघाडीवर असते.समाजसेवा हीच आमच्या संघटनेची ओळख आहे.आमची संघटना पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत २६ सरपंच निवडून आणत असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडून आणण्याची क्षमता आमच्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांत आहे.आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू.असा विश्वास बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments