Advertisement

जय वळवीच्या हत्येत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा हात?आरोपींचे फोटो चंदूभैयासोबत!


चंदूभैयाला नंदूरबार जिल्ह्य़ातून हाकलण्याची गरज- सुशिलकुमार पावरा

नंदूरबार प्रतिनिधी:- जय वळवी या आदिवासी युवकांवर चाकू हल्ला करून खून करण्यात आला. खूनाच्या आरोपीचा फोटो शिवसेना शिंदेगटाचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी सोबत ,मोहीत राजपूतची हत्या झाली आरोपीचा फोटो चंदूभैया सोबत.नंदुरबार जिल्ह्य़ातील जे काही खुनाच्या घटना होत आहेत, त्या घटनेतील आरोपी चंदूभैयासोबत असल्याची  फोटो वायरल होत आहेत. हे आरोपी चंदूभैयाची माणसे आहेत, चंदूभैया हा गुंड प्रवृत्तीचा, गुन्हे प्रवृत्तीचा आहे अशी शंका निर्माण लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.
                जय वळवीचा खून करून आमच्या मार्गातला मोठा काटा कायमचा दूर केला आहे,आम्ही राजकीय पुढारी  जिंकलो,असे पुढा-यांना वाटत असेल.कितीही काही केले तरी आमची आदिवासींची चळवळ कधीच थांबणार नाही.जय वळवीच्या खूनाचा आरोपी हा शिवसेना शिंदेगट नगरसेवकचा नातेवाईक आहे.ही गोष्ट समोर आली.आरोपीला वाचविण्यासाठी नातेवाईकांनी नौटंकी सुद्धा केली.नंदूरमधला शिवसेना शिंदेगट म्हटल्यावर चंदूभैया आलाच,या आरोपीला वाचविण्याचा चंदूभैयाने काम केले असणार, अशी शंका निर्माण होते, म्हणून चंदूभैयाची काॅल रेकॉर्डींग व एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे,अशी आम्ही आदिवासी संघटना  ळ मागणी करत आहोत.जय वळवीची हत्या ही एका आदिवासी युवकाची हत्या नसून संपूर्ण आदिवासी समाजाची हत्या आहे.जो आदिवासींचा आवाज उठवेल त्याला पूर्ण पणे संपण्याचे कटकारस्थान राजकीय पुढारी करत आहेत. जय वळवीची हत्या ही पूर्वनियोजित कट होता. कारण सिसी टिव्हीमधील विडीओत स्पष्ट दिसते की,आरोपी सूर्यकांत मराठे हा गाडीतून मोठा चाकू काढून जय वळवीवर हल्ला करीत आहे,समोर पोलीस कर्मचारी चेतन चौधरी बघ्याची भूमिका बजावत आहे,इशारा करत आहे.त्यामुळे पोलिसांवर सुद्धा शंका निर्माण होते.आरोपी हा सोबत चाकू घेऊन जय वळवीला मारायलाच आला होता.
                     नंदूरबार जिल्ह्य़ात चंदूभैया नावाची मोठी घाण तयार झाली आहे,ती साफ करण्याची गरज निर्माण झाली आहे.हा चंदू भैया नंदूरबार तून हाकलला तर बरेच खूनाचे गुन्हे कमी होतील. चंदूभैया आदिवासी आरक्षण विरोधात बोलत आहे,आमच्या आदिवासी पुढा-यांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाही,अशी धमकी देत आहे.याला एवढी डेरींग का येते,कारण आपल्याच लोकांनी याला मोठं केल आहे.शिवसेना शिंदेगटाच्या आदिवासी कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, या चंदूभैयाला मोठ करू नका. सापाला कितीही दूध पाजलं तरी तो आपल्याला ढसणारच, तसा चंदूभैया आदिवासी आरक्षण बद्दल बोलून करत आहे.चंदू भैया नावाचे मध्यप्रदेश यूपी बिहारचे पार्सल नंदूरबार जिल्ह्य़ातून परत पाठवायची गरज निर्माण झाली आहे.म्हणून वाटल्यास मी पुढाकार घेतो,मी जबाबदारी घेतो, या चंदूभैयाला नंदूरबार जिल्ह्य़ातून हाकलायला. तुम्ही मला साथ द्या,पाठिंबा द्या.आपण १ मिनीटात या चंदूभैयाला नंदूरबार जिल्ह्य़ातून हाकलू शकतो,फक्त आपली एकजूट हवी.आपली आदिवासींची मोठी ताकद आहे.या चंदूभैयाला नंदूरबार जिल्ह्य़ातून हाकलल्याशिवाय आपण आता शांत बसायचे नाही.चंदूभैया हटाओ, नंदूरबार के आदिवासी युवा बचाओ! अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments