Advertisement

आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे लाखोंच्या संख्येने आदिवासींचा ऊलगुलान जन आक्रोश मोर्चा!


बंजारा,धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ! नारा

शहादा प्रतिनिधी: आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे सकल आदिवासी समाज शहादा तालुका तर्फे  दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी आदिवासींचा ऊलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले.मोर्चाची सुरवात क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथून करण्यात आली.अहिंसा चौक ,महात्मा ज्योतिबा फुले चौक ,बस स्टँड, महात्मा गांधी पुतळा, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत मोर्चा काढण्यात आला.बंजारा,धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, हम हमारा हक मांगते नही किसीसे भिख मांगते,बिरसा मुंडा करे ऊलगुलान- ऊलगुलान , आरक्षण की रक्षा कौन करेगा,हम करेंगे, अशा जोरदार घोषणा मोर्चक-यांनी दिल्या. उपविभागीय अधिकारी शहादा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
                 या मोर्चात विविध आदिवासी संघटना, दलित संघटना, विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला. बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, गोविंद पावरा,संजय भोसले यांनी जंगलातील ख-या आदिवासींची भूमिका  बजावली तर भगवान बिरसा मुंडाची भूमिका दिपक तडवी यांनी साकारली.मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.आदिवासी संस्कृती टिकवा तरच आरक्षण टिकेल, अशी प्रतिक्रिया सभेचे अध्यक्ष आदिवासी ज्येष्ठ साहित्यिक वाहरूदादा सोनवणे यांनी दिली.आरक्षण हा आमचा संविधान अधिकार आहे,बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण पाहिजे ही चूकीची व असंवैधानिक मागणी करत आहे.आदिवासींच्या आरक्षणात आम्ही कोणाचीच घुसखोरी सहन करणार नाहीत.आदिवासींच्या आरक्षणात सरकारने छेडछाड करू नये,अन्यथा सरकारला आदिवासींना आवरायला पोलीस यंत्रणा कमी पडेल.असा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिला.या मोर्चात भारतीय संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, पावरा बारेला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक,आमदार राजेश पाडवी,माजी आमदार पद्माकर वळवी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,तुकाराम पावरा,चंपालाल भंडारी इत्यादी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक,दिपक ठाकरे,दादाभाई पिंपळे, जमन ठाकरे,सुरेश मोरे सह वनिता पटले , माजी सभापती वांगीबाई पावरा इत्यादी हजारों आदिवासी  महिला मोर्चात आपल्या आदिवासी वेशभूषेत सहभागी झालेत.

Post a Comment

0 Comments