शहादा प्रतिनिधी: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि कृषी मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार माणिकराव कोकाटे यांच्याकडे तहसीलदार शहादा यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी ,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन होत आहे.नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने व वादळी वा-याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दरम्यान शहादा तालुक्यातील अनेक खेड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच जीवनमान विस्कळीत झाले आहे. यात शेतकरी बांधवांचे पिक उत्पादन या पावसामुळे नुकसान झाले आहे, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेड्यात तुरळक प्रमाणात परिसरात वादळी वाऱ्यासह हाहाकार उडाला. शहादा तालुक्यात येथे सर्वात जास्त नुकसान झाले असून येथे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याने अनेक घरांचे इंगलसहपत्रे उडाली आहेत. यामुळे अनेकांचे संसार उघडयावर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर मोठ्या प्रमाणात झाडे उमळून पडली असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण फिरावे लागत आहे. या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरे सुद्धा पडल्याने आदिवासी कुटुंबियाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आले आहे
0 Comments