Advertisement

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा तालुक्यातील वनपट्टे निकाली काढा:-बिरसा फायटर्स संघटनेकडून मागणी



विभागीय स्तरावरील १८ महिन्यांपासून प्रलंबित अपिलीय वनदावे निकाली न झाल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन

शहादा प्रतिनिधी:-शहादा व तळोदा तालुका जिल्हा नंदुरबार येथील गावातील विभाग स्तरावरील १८ महिन्यांपासुन प्रलंबित अपिलीय वनदावे निकाली काढणेबाबत.. अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मा.अप्पर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक,मा जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार,मा.उपविभागीय अधिकारी साहेब शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे,यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जगदीश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते 
         निवेदनात म्हटले आहे की आपल्या विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे नंदूरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा तालुक्यातील अनेक गावातील वनदावे गेल्या १८ महिन्यांपासून प्रलंबित आहेत, त्यावर सुनावणीही झालेली नाही अथवा कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहादा तालुक्यातील शहाणे, भुलाणे वडगाव या तीन गावातील वनदावे आपल्या कार्यालयात अपिल अर्ज सादर केलेले आहेत. शहादा तालुक्यातील शहाणा या गांवातील एकूण २३ वनदावे फाईल्स विभाग स्तरावर प्रलंबित आहेत. यापूर्वी दिनांक २६/०७/२०२४ रोजी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. तीन वेळा निवेदन दिले असून सुद्धा प्रशासन दाव्यांबाबत दखल घेण्यास टाळाटाळ करत आहे. तरी आपल्या कार्यालयात सादर करण्यात आलेली नंदूरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा तालुक्यातील गांवांतील प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढण्यात यावेत, हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून विभागीय कार्यालय नाशिक समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा बिरसा फायटर्सनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे

Post a Comment

0 Comments